लॉकडाऊननंतर गगनाला भिडणार पेट्रोल, डिझेलच्या किंमती, कोरोना नाही तर 'हे' आहे कारण

लॉकडाऊननंतर गगनाला भिडणार पेट्रोल, डिझेलच्या किंमती, कोरोना नाही तर 'हे' आहे कारण

OMCच्या सूत्रांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन हटवल्यानंतर ऑटो इंधनच्या दैनंदिन किंमतीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : कोरोना विषाणू सारख्या संकटामध्येच सामान्यांना आणखी एक संकटाचा येत्या काळात सामना करावा लागणार आहे. पुढच्या महिन्यापासून सामान्यांनापेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. खरं तर, मे नंतर तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत सुधारणा करण्यास सुरवात करू शकतात, त्यानंतर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे महाग होईल.

OMCच्या सूत्रांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन हटवल्यानंतर ऑटो इंधनच्या दैनंदिन किंमतीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे झाल्यास, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.

सरकारच्या मालकीच्या ओएमसी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून दैनिक जागरणला सांगितले की, 16 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि यामुळे सरकारने किरकोळ उत्पादनांवर परिणाम न करता दोन्ही उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढविले. सरकारी क्षेत्रातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता दररोज किंमत सुधार योजना सुरू झाल्यानंतर ऑटो इंधन काही दिवस तेजीत येऊ शकेल.

वाचा-प्रवाशांच्या पडल्या उड्या, रेल्वेची 3 तासांमध्ये बुक झाली 54,000 हजार तिकीटं

दरम्यान, सरकारी सुत्रांनी असे संकेत दिले की दररोजच्या किंमतीत सुधारणा केल्यावरही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत निर्धारित प्रमाणपेक्षा अधिक वाढ करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा होईल की पेट्रोलियम उत्पादनांमध्ये दररोज 30-50 पैशांची वाढ होऊ शकते किंवा तेल कंपन्या खर्च आणि विक्रीतील तफावत दूर करेपर्यंत कमी होऊ शकतात.

वाचा-कोरोनाच्या संकटात एक आनंददायी बातमी; गावी परतणाऱ्या ट्रेनमध्ये एका मुलीचा जन्म

दररोजच्या किंमतींच्या पुनरीक्षणानुसार किरकोळ किंमतीत झालेली वाढ तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची किंमत 50 टक्के जास्त आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाली आहे.

वाचा-ठाण्यात आज मध्यरात्रीपासून होणार मोठा बदल, हे विभाग होणार पूर्णत: बंद

First published: May 12, 2020, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading