आजही तेलाच भडका, पेट्रोल 28 तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ

आजही तेलाच भडका, पेट्रोल 28 तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात २८ पैसे तर डिझेलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली.

  • Share this:

मुंबई, ता. 16 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात २८ पैसे तर डिझेलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे दर ८९ रुपये २९ पैसे, तर डिझेल ७८ रुपये २६ पैशांवर गेलंय. शनिवारीही पेट्रोल ३४ पैशांनी महागलं होतं. म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत आज पेट्रोल एक रुपयानं वाढलंय. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलाचे दर कमी होत नाहीयेत, आणि केंद्र आणि राज्य सरकारं कर कमी करत नाहीयेत.. त्यामुळे सामान्य माणसाला इंधन दरातून दिलासा मिळत नाहीये.

आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांनी तेलावर राज्य सरकार लावत असलेल्या टॅक्समध्ये कपात केल्यानं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. तर राज्य सरकार तेलाच्या किंमती कशा कमी करता येतील याचा आढाव घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

लवकरच किंमती आटोक्यात - शहा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमागे आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचेही ते म्हणाले.

पेट्रोलचा 'स्फोट' : कशी ठरते किंमत ?

तेल कंपन्या कितीला विकतात - 48 रु.

अबकारी कर - 19.48 रु.

(केंद्र सरकार)

व्हॅट - 18.97 रु.

(राज्य सरकार)

डीलरचं कमिशन - 3.60 रु.

 इतर देशांमधले तेलाचे दर

      देश                पेट्रोल           डिझेल

पाकिस्तान           65.20         61.56

श्रीलंका                69.09        51.90

नेपाळ                  71.25         59.43

चीन                     78.95         70.49

ब्रिटन                   119           121.80

अमेरिका              53.88        58.90

 

 

बाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात

First published: September 16, 2018, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading