पेट्रोल 1.39 तर डिझेल 1.04 रूपयांनी महागलं, आजपासून नवे दर लागू

पेट्रोल 1.39 तर डिझेल 1.04 रूपयांनी महागलं, आजपासून नवे दर लागू

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.

  • Share this:

16  एप्रिल :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे.  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महाग झालं आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत.

यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.

पेट्रोल प्रतिलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र, ग्राहकांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. तेल कंपन्यांनी लगेचच १५ दिवसांनी पुन्हा दरात वाढ केली  आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 12:48 PM IST

ताज्या बातम्या