News18 Lokmat

मोदी सरकारच्या 'या' मास्टरस्ट्रोकनंतर पेट्रोल होणार 7 ते 8 रुपये स्वस्त

मार्चपर्यंत पेट्रोल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 02:58 PM IST

मोदी सरकारच्या 'या' मास्टरस्ट्रोकनंतर पेट्रोल होणार 7 ते 8 रुपये स्वस्त

नवी दिल्ली, 3 जानेवारी : येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमतीत मोठी कपात होण्याची शक्यता आहे. 15 टक्के मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल लवकरच पेट्रोल पंपांवर विकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मार्चपर्यंत पेट्रोल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पेट्रोल पंपांवर मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल विकण्याआधी लवकरात लवकर काही बदल करणं गरजेचं आहे. 'पंपावर लवकरच बदल केले जातील. तसंच एक अतिरिक्त रिफीलिंग मशीन लावली जाईल. 45 दिवसांत 50 हजार पेट्रोल पंपांवर बदल करणं शक्य आहे, ' असं नीती आयोगांनं स्पष्ट केलं आहे.

नीती आयोगाची पुढील आठवड्यात एक बैठक होणार आहे. या बैठकीत मिथेनॉलची उपलब्धता वाढवण्यावर चर्चा होणार आहे. याच मुद्द्यावर तेल कंपन्या आणि सर्व स्टेक होल्डर्ससोबत एक बैठक होणार आहे.

कधीपासून मिळणार स्वस्त पेट्रोल?

-मिथेनॉलपासून वाहनं चालवण्याच्या दृष्टीने वेगाने काम होत आहे

Loading...

-15 टक्के मिथेनॉलचं प्रमाण असलेल्या पेट्रोलपासून वाहनं चालवणं शक्य होत आहे

-45 दिवसांत 50 हजार पेट्रोल पंपांवर बदल करणं शक्य आहे

सरकारने का घेतला हा निर्णय?

-इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त आहे

-इथेनॉलची किंमत 40 रुपये प्रतिलीटर एवढी आहे तर 20 रुपये प्रतिलीटरपेक्षाही कमी आहे

-मिथेनॉलने प्रदुषणात घट होण्यास मदत होईल


VIDEO: मोदींवरच्या जहरी टीकेनंतरही शिवसेनेला सोबत घेणार? रावसाहेब दानवे म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...