Elec-widget

पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना!

पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार, ही आहे मोदी सरकारची योजना!

सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं पण त्याचं प्रमाण कमी आहे. मिथेनॉल त्यापेक्षाही स्वस्त आहे.

 • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : पेट्रोल डिझेलने लोकांचं कंबरडं मोडलेलं असताना आता एक खुशखबर आहे. पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याची करण्याची सरकारची योजना असून त्यामुळं पेट्रोलचे भाव तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात त्याच्या चाचण्याही सुरू आहेत. त्यात यश आलं तर पेट्रोल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.


सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं पण त्याचं प्रमाण कमी आहे. उसाच्या चिपाडापसून इथेनॉल बनवलं जातं. त्याचा भाव एका लिटरला 42 रुपये आहे. तर मिथेनॉल हे कोळशापासून तयार केलं जातं ते एका लिटरला 20 रुपये एवढ्या स्वस्त दरात ते उपलब्ध होऊ शकतं.


काय आहे सरकारची योजना?

Loading...


 • पेट्रोलचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न.

 • काही महिन्यामध्ये 15 टक्के मिथेनॉल असलेल्या गाड्या धावण्याचं उद्दीष्ट

 • पुण्यात मारुती आणि हुंदाईच्या गाड्यांवर प्रयोग सुरू

 • दोन ते तीन महिन्यात या प्रयोगाचा अहवाल येणार

 • इथेनॉलपेक्षा मिथेनॉल स्वस्त आहे. त्यामुळं पैशांची बचत होणार.

 • मिथेनॉलमुळे प्रदूषणही कमी होणार आहे.


मिथेनॉल कुठून आणणार?


 • देशांतर्गत उत्पादन वाढणार आणि आयातीवर भर देणार

 • RCF (राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर) आणि GNFC (गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन) ची क्षमता वाढविणार

 • मिथेनॉल आयात करण्यासाठी नीती आयोगाची चाचपणी

 • चीन, मेक्सिको आणि मध्यपूर्वेतल्या देशांमधून मिथेनॉल आयात करणार


VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...