पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशांतर्गत स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घट झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 2, 2018 11:49 AM IST

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर

मुंबई, ता. 02 जून : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशांतर्गत स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घट झाली आहे. शनिवारी देशभरातील चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 9 पैशांनी स्वस्त झालं आहे. गेल्या 4 दिवसांत पेट्रोल 23 पैसे स्वस्त तर डिझेल 20 पैसे प्रति लिटरने स्वस्त झालं आहे.

इंधनाचे वाढते दर पाहता गेल्या काही दिवसांत केरळ राज्याने पेट्रोल आणि डिझेलवर कमी कर आकारण्याची घोषणा केली होती. केरळ राज्य सरकारने एक रुपयाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल म्हणजेच 1 जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आजचे पेट्रोल आणि डिझेल दर

आईओसीच्या वेबसाईटवर दिलेल्या किंमतीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोल 78.20 रुपये आणि डिझेल 69.11 रुपये प्रतिलिटर इतक्या किंमतीत आहे. पण मुंबईत पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त आहेत. मुंबईत पेट्रोल 86.01 रुपये आणि डिझेल 73.58 रुपये प्रतिलिटर आहे. या आधी, 16 दिवसांमध्ये पेट्रोलवर 4 रुपये आणि डिझेलवर 3.62 रुपयांनी वाढ झाली आहे.

का स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल ?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 5 टक्क्याने खाली आले आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरवरून 76 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलचे दर कमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी

पेट्रोल, डिझेल पाठोपाठ आता विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला

7 पैशांनी घटले पेट्रोलचे दर तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2018 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close