S M L

7 पैशांनी घटले पेट्रोलचे दर तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त

16 दिवसांनंतर, बुधवारी पेट्रोलच्या किमतीत फक्त 1 पैशांनी घट झाली होती तर आज गुरुवारी 7 पैशांनी पेट्रोल तर डिझेल प्रति लीटर 5 पैशांनी स्वस्त झालं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 31, 2018 09:52 AM IST

7 पैशांनी घटले पेट्रोलचे दर तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त

मुंबई, ता. 31 मे : थोड्या उशीरा का होईना पण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता कमी होताना दिसत आहेत. 16 दिवसांनंतर, बुधवारी पेट्रोलच्या किमतीत फक्त 1 पैशांनी घट झाली होती तर आज गुरुवारी 7 पैशांनी पेट्रोल तर डिझेल प्रति लीटर 5 पैशांनी  स्वस्त झालं आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 86.16 प्रति लीटर इतके आहेत तर काल हेच दर 86.23 रुपये इतके होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती थंडावल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल 78.42 रुपयांवरून 78.35 रुपयांवर आले आहेत तर डिझेल 69.30 रुपयांवरून कमी होऊन 69.25 रुपये प्रति लीटरवर आलं आहे.

दरम्यान, सर्व महानगरे आणि राज्यांमध्ये दिल्लीत सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. कालही पेट्रोल, डिझेलच्या दरात घट पहायला मिळाली पण ती फक्त 1 पैशांची होती. जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती.गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्याविरोधात अनेत आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले पण दरम्यान आज कुठे 16व्या दिवशी या दरवाढीत थोड्या फार प्रमाणात घट झालेली पहायला मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2018 09:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close