• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • लॉकडाऊननंतर इंधनानं गाठला उच्चांक, पेट्रोल 25 तर डिझेल 21 पैशांनी महाग

लॉकडाऊननंतर इंधनानं गाठला उच्चांक, पेट्रोल 25 तर डिझेल 21 पैशांनी महाग

तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : इंधन दरवाढीविरोधात शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेक ठिकाणी आंदोलनं करूनही इंधनाचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. 21 दिवसांत डिझेल 11 रुपयांनी वाढलं आहे. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबईत पेट्रोल 87 तर दिल्लीत डिझेल 80 रुपये झालं आहे. सलग 21 व्या दिवशी पेट्रोल 25 तर डिझेल 21 रुपयांनी महाग झालं आहे. गेल्या 21 दिवसांत डिझेल 11 रुपयांनी तर पेट्रोल 9.12 रुपयांनी महाग झालं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर दिल्ली- डिझेल 80.40 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर मुंबई- डिझेल 78.71 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 87.14 रुपये प्रति लिटर कोलकाता - डिझेल 75.52 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83. 59 रुपये प्रति लिटर चेन्नई-डिझेल 77.61 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83.18 रुपये प्रति लिटर बंगळुरू-डिझेल 76.45 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 82.99 रुपये प्रति लिटर लखनऊ-डिझेल 72.37 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.94 रुपये प्रति लिटर हे वाचा-आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लॉकडाऊन वाढला; मंत्रालयाने केली मोठी घोषणा हे वाचा-VIDEO: चीनच्या सीमेजवळ भारताची लढाऊ विमाने तैनात, लष्कराने सुरू केला युद्धसराव पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. संपादन- क्रांती कानेटकर
  First published: