हुश्श, पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

हुश्श, पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे वैतागलेल्या सर्वसामन्य जनतेला थोडासा दिलासा मिळालाय

  • Share this:

03 आॅक्टोबर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे वैतागलेल्या सर्वसामन्य जनतेला थोडासा दिलासा मिळालाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात होणार आहे. नवे दर 4 आॅक्टोबरपासून लागू होणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दर चांगलेच वाढले आहे. देशातील मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दर तब्बल 80 रुपयापर्यंत पोहोचला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता कपात झालीये.  एक्साईज ड्युटीवरील घटवली असल्यामुळे 2 रुपयांनी कपात होणार आहे.

एक्‍साइज ड्युटी कमी करण्यात आल्यामुळे दिल्लीत पेट्रोल 68.83 तर डिझेल 57.07 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर जवळपास 76.99 तर डिझेल 60.82 स्वस्त होणार आहे. अर्थ मंत्रालयाने टि्वट करून पेट्रोल दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय.

एक्‍साइज ड्युटी कमी झाली तर त्याचा फायदा सर्वसामन्यांना लगेच होत नसतो. पण याचा परिणाम पेट्रोलियम कंपन्यांवर होणार आहे. त्यामुळे इंधनाच्या किंमतीत कपात झालीये.

अर्थ मंत्रालयाने हा सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय. सोबतच या निर्णयामुळे एका वर्षात 26 हजार कोटी आणि या वर्षी आर्थिक वर्षातील उरलेल्या अवधीत 13 हजार कोटींचं नुकसान होणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर घसरले आहे. त्यामुळे आशा आहे की भारतातही पेट्रोलचे दर कमी होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 07:47 PM IST

ताज्या बातम्या