सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात घट

सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात घट

देशातील चार महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. इंधनाचे दर कमी केल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : देशभरात वाढत्या इंधनाच्या दराबाबत आंदोलनं सुरू असताना केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले असून देशातील चार महत्त्वाची शहरं दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नईत दरवाढ कमी करण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात शनिवारपर्यंत पेट्रोल 87.46 रुपये लिटर तर डिझेल 79.00 रुपये लिटर होते. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी कमी करण्यात आलं आहे. इंधनाच्या दरात घट केल्यानंतर मुंबई शहरात पेट्रोलची किंमत 87.21 रुपये लिटर आणि डिझेल 78.82 रुपये लिटर आहे.

देशाची राजधानी दिल्लीतसुद्धा इंधनाचे दर कमी केल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि दिल्लीत कमी केलेल्या दरात जास्त फरक दिसून येत नसला तरी दोन्ही शहरात इंधनाच्या किंमतीत बराच फरक आहे. पेट्रोल 25 तर डिजेल 17 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहेत. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 81.74 रुपये लिटर आणि डिझेल 75.19 रुपये लिटर आहे.

VIDEO : पाकिस्तानची ही बाजू तुम्ही कधी पाहिली का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 08:45 AM IST

ताज्या बातम्या