Home /News /national /

ज्ञानवापीनंतर मथुरातील इदगाह मशीद सील करण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

ज्ञानवापीनंतर मथुरातील इदगाह मशीद सील करण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर (Gyanvapi Mosque of Varanasi) आता मथुरा येथील वादग्रस्त इदगाह मशीद (Idgah Mosque) परिसर सील करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

  मथुरा, 17 मे : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर (Gyanvapi Mosque of Varanasi) आता मथुरा येथील वादग्रस्त इदगाह मशीद (Idgah Mosque) परिसर सील करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या मागणीसाठी मथुरा न्यायालयात (Mathura Court) याचिकाही दाखल करण्यात आली आहे. हिंदू धर्माच्या लोकांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते यांचा दावा आहे की, गर्भगृह आणि इतर पुरातत्व मंदिराच्या अवशेषांचे नुकसान होऊ शकते. तसेच परिसर सील न केल्यास ते काढून टाकले जाऊ शकतात. या प्रकरणावर सुनावणी संदर्भात आता न्यायालय निर्णय घेणार आहे. वाराणसीच्या ज्ञानव्यापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर त्या जागेला सील करण्यात आले. इथे मशिदीचा वजूखाना आहे. तर ज्ञानव्यापी मशिद परिसर सील केल्यानंतर आता मथुरा येथील ईदगाह मशिद सील केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी मथुरा येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नेमकी काय आहे मागणी? हिंदू याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे, “ज्ञानवापी मशिदीत हिंदू शिवलिंगाचे अवशेष सापडले, त्यावरून हे स्पष्ट होते की, याच कारणामुळे प्रतिवादी मुस्लिम पक्ष सुरुवातीपासूनच तेथे विरोध करत आहेत. हीच स्थिती मूळ गर्भगृह असलेल्या श्री कृष्ण जन्मभूमीची आहे. याठिकाणी कमळ, शेषनाग, ओम, स्वस्तिक इत्यादी सर्व हिंदू धार्मिक अवशेष, हिंदू धार्मिक प्रतीके आहेत. त्यापैकी काही पुसून टाकण्यात आले आहेत. जर हिंदूंचे अवशेष नष्ट झाले तर मालमत्तेचे स्वरूप बदलेल आणि खटल्यातील वस्तू व पुरावे नष्ट होतील. अशा परिस्थितीत इदगाह मस्जिद येथे सर्वांच्या हालचालींवर निर्बंध घालावेत. तसेच परिसरासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था करावी किंवा परिसर सील करावा, अशी मागणी हिंदू याचिकाकर्त्यांनी केली आहे. परिसर सील करुन सुरक्षा अधिकारी नियुक्त करा. तसेच या मालमत्तेपासून बनवलेल्या प्राचीन हिंदू धार्मिक चिन्हे, स्वस्तिक, कमळ, उम आणि इतर कलाकृती नष्ट करू नयेत, अशी सूचनाही त्यांना देण्यात यावी. यासोबतच 1 जुलैऐवजी तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा - ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस सर्वेक्षण, शिवलिंग आढळल्याचा हिंदू पक्षाचा दावा, फोटो समोर
  मथुरामध्ये शाही ईदगाह आणि श्री कृष्णजन्मभूमीवरून बराच काळ वाद सुरू आहे आणि तिथल्या दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत महेंद्र प्रताप यांच्या या याचिकेवर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाचे न्यायालय सुनावणी करू शकते, असे मानले जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Religion, Temple, Uttar pradesh news

  पुढील बातम्या