परवेज मुशर्रफ गंभीर आजारानं त्रस्त; दुबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

परवेज मुशर्रफ गंभीर आजारानं त्रस्त; दुबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

परवेज मुशर्रफ यांना दुबईतील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

दुबई, 18 मार्च : कुरापती पाकिस्तानातून बाहेर पडून दुबईमध्ये आश्रयासाठी गेलेले पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांची प्रकृती खालावली आहे. मुशर्रफ गंभीर आजारानं त्रस्त असून त्यांना दुबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. परवेज मुशर्रफ यांच्यावर पूर्वीपासूनच उपचार सुरू होते. पण, त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'डॉन न्यूज'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शनिवारी (16 मार्च) त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे जनरल सेक्रेटरी अदम मलिक यांनी मुशर्रफ यांच्याबाबतची माहिती दिली.

2007मध्ये संविधानाचा अपमान केल्याचा आरोप मुशर्रफ यांच्यावर मार्च 2014मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दुबईमध्ये आश्रय घेतला. दुबईला गेल्यानंतर परवेज मुशर्रफ पाकिस्तानमध्ये परत आलेच नाहीत.

भारताबाबत दिली धक्कादायक कबुली

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर मुशर्रफ यांनी भारतातील काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यामध्ये त्यांनी माझ्या काळात देखील भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यात आल्याची कबुली दिली होती. शिवाय, जैश-ए- मोहम्मदनं माझ्यावर हल्ला करून मला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं देखील म्हटलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच दहशतवादाचं माहेरघर असल्याचं स्पष्ट झालं होतं.

VIDEO: गोंयचो भाई हरपलो... शोकमग्न गोवेकरांनी व्यक्त केल्या भावना

First published: March 18, 2019, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading