एटीएमचा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार

पण रणव सिंह या सुरक्षा रक्षकानं हा प्रयत्न हाणून पाडला, आज त्याचा पणजीत सत्कार होणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2017 04:27 PM IST

एटीएमचा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार

पणजी, 29 ऑक्टोबर: आता बातमी एका शूर सुरक्षा रक्षकाची. पणजीमधल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 27 ऑक्टोबर रोजी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण रणव सिंह या सुरक्षा रक्षकानं हा प्रयत्न हाणून पाडला, आज त्याचा पणजीत सत्कार होणार आहे.

हल्ली बॅँकांच्या एटीएमवर दरोडा टाकण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रच्या पणजी एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण हा दरोड्याचा प्रयत्न रणव सिंग या सुरक्षा रक्षकाने हाणून पाडला आहे. दरोडा टाकायला आलेल्या चोराशी सिंह यांनी झटापट केली. त्यांना पळवून लावले. त्यांनी एटीएम लुटू दिले नाही. शौर्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...