नागोर, 17 जून : कोरोना कालावधीत लॉकडाऊन असल्याने लाखो वीज (Electricity) ग्राहकांना सरकारकडून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा होती. पण, वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं ग्राहक मीटरचे रीडिंग न घेता सरासरी रकमेच्या दोन ते चार पट बिले (Electricity Bill) पाठवल्याचा घटना उघडकीस आल्या आहे. गरीबांना या काळात लाखो आणि कोट्यवधी रुपयांची बिले पाठविण्यात आली आहेत. अशीच एक घटना मकराना शहरात समोर आली आहे.
येथे वीज वितरण कंपनी डिस्कॉमने रस्त्यावर लिंबू-पाणी विकणाऱ्या अब्दुल सत्तार नावाच्या व्यक्तीला दोन महिन्यांचे विजेचे बील 1 कोटी 59 लाख 96 हजार 143 इतकं भलं मोठ पाठवलं. इतक्या मोठ्या रकमेचे बिल पाहून या व्यक्तीला पहिल्यांदा बिलावर विश्वासच बसला नव्हता. परंतु, त्याने याविषयी आजूबाजूच्या लोकांना सांगितले आणि प्रत्येकाने बील बघून ही बील रक्कमच असल्याची खात्री केल्यानंतर मात्र, या लिंबू-पाणी विक्रेत्याचा बीपी वाढून त्याला चक्करच आली. त्याला कुटुंबातील लोकांनी कसे-बसे सावरले.
या प्रकरणाची माहिती डिस्कॉमच्या अधिकाऱ्यांना समजताच घाईघाईने संध्याकाळी उशिरा बिलातील चूक दुरुस्त करून आणि टायपिंगच्या चुका झाल्याचे सांगून मूळ 1500 रुपये आले असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात घडला आहे.
हे वाचा -
नारायण दाभाडकरांना जावायानेच नेलं होतं घरी, काँग्रेसच्या नेत्याने केला पुराव्यानिशी खुलासा
गरीब अब्दुल सत्तारचा बीपी असा वाढला
अब्दुल सत्तार यांनी घरासाठी फक्त एक किलोवॅट वीज कनेक्शन घेतले आहे. परंतु, यावेळी 5 मे रोजी दोन महिन्यांकरिता वीज बिलाचे रीडिंग आले 18,59,783 युनिट. त्यावर बिल जमा करण्याची शेवटची तारीख 17 जून दाखवली होती, त्यात एकूण थकबाकी 1 कोटी 59 लाख 96 हजार 143 रुपये होती. तर उशिरा रक्कम जमा केल्यास अतिरिक्त 3,74,544 रुपये भरावे लागतील असे दर्शवले होते. या बिलाचा आकडा पाहून सर्वांना धक्काच बसला. अब्दुल सत्तार यांची तर प्रकृती खालावली आणि त्यांचा बीपी वाढला. घरातील व्यक्तींनी त्यांना सावरत वीज वितरण कंपनीकडे या गोष्टीची तक्रार केली. त्यानंतर तातडीनं वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी येवून पुन्हा रिडिंग तपासली असता 1555 एवढी होती. त्याद्वारे त्यांना सुधारित 1500 रुपयांचे बील देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.