S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मतदार यादीत नाव नसल्याने धक्का, हार्ट अ‍टॅकने एकाचा मृत्यू!

केरळमध्ये 20 जागासाठी मतदान सुरु आहे. या मतदान प्रक्रियेत वेगवेगळ्या केंद्राबाहेर 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Updated On: Apr 23, 2019 03:58 PM IST

मतदार यादीत नाव नसल्याने धक्का, हार्ट अ‍टॅकने एकाचा मृत्यू!

तिरुवनंतपूरम, 23 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 14 राज्यातील 117 जागासाठी मतदान होत आहे. केरळमध्ये 20 जागासाठी मतदान सुरु आहे. या मतदान प्रक्रियेत वेगवेगळ्या केंद्राबाहेर 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यातील एकाचा मृत्यू मतदार यादीत नाव नसल्यामुळे हार्ट अटॅकने झाला.

कन्नर जिल्ह्यात चोकली येथे रामविसासम येथील केंद्राबाहेर एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर वेणुगोपाल यांचा मतदानकरून घरी जात असताना मृत्यू झाला. पटनाथिट्टा जिल्ह्यात 66 वर्षीय चाको मथाई यांचा तर एर्नाकुलम येथे थ्रेस्य कुट्टी यांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय कोल्लम येतील किलोकोल्लूर शाळेतील मतदान केंद्रावर मणी यांचा मृत्यू झाला. वायनाडमधील आदिवासी कॉलनीतील के.बालन आणि मावेलिक्करा येथील के प्रभाकरण याचे देखील मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. यातील धक्कादायक घटना म्हणजे कोल्लममध्ये मृत्यू झालेल्या मणी हे मतदानासाठी आले असता त्यांना यादीत त्यांचे नाव नसल्याचे समजले. याचा त्यांना इतका धक्का बसला की हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय आळपुल्ला येथील केंद्रावर एका अधिकाऱ्याला हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


राज्यातील सर्व म्हणजे 20 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे.


भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी, निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण; VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close