बेळगावात महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली

बेळगावात महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली

पण उद्याच्या या महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची भावना आहे.

  • Share this:

बेळगाव, 12 नोव्हेंबर: बेळगावात उद्या महाराष्ट्र समितीचा महामेळावा होणार आहे. पण उद्याच्या या महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची भावना आहे.

बेळगावात महाराष्ट्र समितीचा महामेळावा आयोजित केला गेला आहे. या मेळाव्यात सीमा भागातले मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात सामील होतात. पण या मेळाव्याला बेळगाव महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या परवानगी नंतरच मैदान देऊ अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यातच उद्यापासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा मराठी भाषिक विरोध करणार आहे. या अधिवेशनाविरोधात मराठी भाषिकांनी एल्गार केला आहे.

बेळगावच्या मराठी भाषिकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी बेळगावच्या मराठी भाषिकांशी मराठीतच संवाद साधावा असे आदेश राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने कर्नाटक सरकारला दिले होते. 1 नोव्हेंबर हा बेळगावच्या मराठी भाषिकांकडून काळा दिवस म्हणून पाहिला गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading