मराठी बातम्या /बातम्या /देश /

चित्ता, वाघ नव्हे तर 'हा' आहे जगातील सर्वांत वेगवान पक्षी; स्पोर्ट्स कारपेक्षाही जास्त असतो स्पीड

चित्ता, वाघ नव्हे तर 'हा' आहे जगातील सर्वांत वेगवान पक्षी; स्पोर्ट्स कारपेक्षाही जास्त असतो स्पीड

पेरेग्रीन फाल्कन्स

पेरेग्रीन फाल्कन्स

बऱ्याच काळापासून लोक या पक्ष्याचा वापर शिकारीसाठी करत आहेत. या पक्षाचे आयुर्मान 19 ते 20 वर्षापर्यंत असते. हा पक्षी उत्तम शिकारी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 डिसेंबर : तुम्ही जंगलात मोठमोठे आणि हिंस्त्र प्राणी पाहिले असतील. सिंह, वाघ, चित्ता, बिबट्या आदी प्राणी धोकादायक शिकारी असतात, तसेच त्यांचा धावण्याचा वेगही जास्त असतो. पण या सर्व प्राण्यांमध्ये चित्ता सर्वांत वेगवान असून, त्याचा धावण्याचा वेग ताशी 101 किलोमीटर असतो. त्यामुळे अर्थातच चित्ता हा जगातील सर्वांत वेगवान प्राणी आहे. मात्र एक पक्षी असा आहे की ज्याचा वेग हा एखाद्या स्पोर्ट्स कारपेक्षा जास्त आहे.

आम्ही पेरेग्रीन फाल्कन्स अर्थात पेरेग्रीन बहिरी ससाण्याविषयी बोलत आहोत. हा जगातील सर्वांत वेगवान पक्षी असून, तो अंटार्टिका वगळता सर्व खंडांमध्ये आढळतो. मानवाने डीडीटीसारख्या विषारी कीटकनाशकांचा वापर सुरू केल्याने काही वर्षांपूर्वी हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. 1972 मध्ये डीडीटीच्या वापरावर बंदी घातल्यानंतर या पक्ष्यांची संख्या पुन्हा वाढू लागली.

हेही वाचा -  मध्यरात्री पोटात कावळे ओरडतात? हे आहेत काही हेल्दी स्नॅक्स तुमच्यासाठी

बऱ्याच काळापासून लोक या पक्ष्याचा वापर शिकारीसाठी करत आहेत. या पक्षाचे आयुर्मान 19 ते 20 वर्षापर्यंत असते. हा पक्षी उत्तम शिकारी आहे. पण त्याचा सर्वात आश्चर्यकारक गुणधर्म म्हणजे वेग होय. चित्त्याचा टॉप स्पीड 101 किमी प्रतितास आहे आणि फेरारीसारख्या कार ताशी 340 किमी वेगाने धावू शकतात. मात्र या पक्ष्याचा टॉप स्पीड 389 किमी प्रतितास आहे. या पक्ष्याचा सरासरी वेग 320 किलोमीटर प्रतितास आहे.

जेव्हा हा पक्षी सरळ रेषेत उडतो तेव्हा त्याचा सामान्य वेग 40 ते 55 किलोमीटर प्रतितास असतो. दुसरीकडे जेव्हा त्याचा शिकारीशी सामना होतो तेव्हा तो ताशी 112 किलोमीटर वेगाने उडू लागतो.

या पक्ष्याला जेव्हा आकाशातून जमिनीवरील शिकार दिसते, तेव्हा तो शिकार पकडण्यासाठी जमिनीकडे झेपावतो, यावेळी त्याचा वेग सर्वोच्च असतो. उडताना त्याचा वेग ताशी 320 किलोमीटरपर्यंत असतो आणि आतापर्यंत नोंदवला गेलेला त्याचा सर्वोच्च वेग 389 किलोमीटर प्रति तास आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या वेगात इतर कोणाताही पक्षी किंवा प्राणी त्याच्या मार्गात आडवा आला तर त्याचे मानाचे हाड मोडू शकते किंवा इतर पक्ष्यांनी असं केलं तर त्यांच्या फुफ्फुसांना इजा होऊ शकते. या पक्षाची शरीररचना वैशिष्ट्यपूर्ण असते, त्यामुळे तो उत्तम शिकारी असतो, तसेच त्याचा वेगही सर्वाधिक असतो.

हेही वाचा -  तुम्हीही जेवणाबरोबर काकडी खाता? लगेच थांबा हे तुमच्या आरोग्यास ठरेल हानिकारक

या पक्ष्याची उंची आणि वजन कमी असते. एरोडायनॅमिक डायव्हिंगमुळे ते इतका उच्च वेग प्राप्त करू शकतात. या पक्ष्याच्या नाकपुड्यांची रचना पातळ हाडापासून स्पायरल आकाराची बनलेली असते, ज्याला लहान ट्यूबरकल्स म्हणतात. यामुळे या पक्ष्याच्या नाकात थेट हवा न जाता ती फिरून जाते. त्यामुळे फुफ्फुसांना इजा होत नाही आणि ते वेगात उडू शकतात.

या पक्ष्याच्या डोळ्यात निक्टेटिंग मेंब्रेम असतो. यामुळे वेगात उडतानादेखील त्याचे डोळे सुरक्षित राहतात. या पक्ष्याची नजर तीक्ष्ण असते. पेरेग्रीन बहिरी ससाण्याचा व्हिज्युअल प्रोसेसिंग स्पीड 129 Hz असतो. हा स्पीड अन्य कोणत्याही प्राणी, पक्ष्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे तो 129 फ्रेम प्रतिसेकंद पाहू शकतो. मानवाचा व्हिज्युअल प्रोसेसिंग स्पीड 60 Hz असतो.

पेरेग्रीन बहिरी ससाण्याची शिकार करण्याची पद्धत ही अनोखी असतो. भक्ष्याला दुरवरून पाहिल्यानंतर तो खूप वेगात डाइव्ह मारतो, पण एवढ्या वेगामुळे तो एकतर आपल्या भक्ष्याला मारू शकतो किंवा प्रसंगी त्याचाही जीव जाऊ शकतो. त्यामुळे तो जसजसा शिकारी जवळ येतो, तसतसे त्याचे पंख वेगाने फडफडतात. यामुळे त्याचा वेग कमी होतो.

First published:

Tags: Lifestyle