दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास 'या' सुविधा काढून घ्या : रामदेव बाबा

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा असे, मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 24, 2019 11:16 AM IST

दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास 'या' सुविधा काढून घ्या : रामदेव बाबा

अलीगढ, 24 जानेवारी: लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा असे, मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे. ज्या देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा अधिक आहे. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे असे ही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हा सल्ला दिला. ज्यांना दोनपेक्षा अधिक मुले आहेत. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. इतकच नव्हे तर त्यांची सरकारी नोकरी आणि आरोग्याची सुविधा देखील काढून घ्यावी, असे रामदेव म्हणाले. हिंदू असो की मुस्लिम या सर्वांना हा नियम लागू करावा. त्याशिवाय लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही.

लोकसंख्ये संदर्भात रामदेव बाबा यांनी विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी यांनी ज्यांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत त्यांना सरकारी शाळेत प्रवेश देऊ नये, असे विधान त्यांनी केली होती. तर ज्यांनी लग्न केले नाही त्यांचा विशेष सन्मान केला जावा असे ते म्हणाले होते.

प्रियांका गांधींच्या नियुक्तीवर म्हणाले...

प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीपदी नियुक्ती गेलेल्या घटनेवर रामदेव बाबा म्हणाले, ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे.

Loading...


Special Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...