मराठी बातम्या /बातम्या /देश /हेच राहिलं होतं आता! सुट्टे पैसे नसल्याचं सांगताच QR CODE पुढे करतो हा भिकारी

हेच राहिलं होतं आता! सुट्टे पैसे नसल्याचं सांगताच QR CODE पुढे करतो हा भिकारी

हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पाटना, 6 फेब्रुवारी : बेतिया (Bihar News) रेल्वे स्टेशनवर गळ्यात ई-वॉलेटचा QR CODE अडकवलेल्या व्यक्तीचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राजू नावाची ही व्यक्ती भीक मागण्याचं काम करते. तो लहान पणापासून स्टेशनवर राहतो. सुरुवातीपासूनच तो लोकांकडून पैसे मागून आपलं पोट भरायचं कान करतो. तो म्हणतो अनेकदा लोक म्हणायचे सुट्टे पैसे नाहीत, यासाठी त्याने बँकेत खातं सुरू केलं. आता राजू लोकांकडून सुट्टे पैसे घेत नाही तर फोन पेवर QR CODE स्कॅन करून पैसे पाठवण्यास सांगतो. त्यांच्या या वागणुकीची सध्या चर्चा सुरू आहे.

स्वत:ला लालूचा मुलगा आणि PM मोदीचा भक्त असल्याचं सांगितलं..

बसवरिया वार्ड नंबर-30 मध्ये राहणारा प्रभुनाथ प्रसाद यांचा 40 वर्षीय एकुलता एक मुलगा राजू प्रसाद गेल्या 30 वर्षांपासून रेल्वे स्टेशनसह अन्य ठिकाणी भीक मागून आपलं पोट भरतो. गती मंद असल्याकारणाने राजू दुसरं काम करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं. तो लालू यादव यांना बाबा म्हणतो आणि PM मोदींचा भक्त असल्याचं म्हणतो.

हे ही वाचा-अमेरिका रिटर्न शेतकऱ्याने थेट छतावर ठेवला ट्रॅक्टर, खर्च केले 6 लाख रुपये!

सुट्टे पैसे देण्यास नकार, म्हणून डिजिटल पेमेंट..

QR CODE वरुन भीक मागण्याच्या निराळ्या अंदाजामुळे राजू जिल्ह्यात चर्चिला जात आहे. तो स्टेशन आणि बस स्टँडच्या बाहेर येणाऱ्यांकडून मदत मागतो. अनेकदा लोक मदत करण्यास नकार देता. अशावेळी ते सुट्टे नसल्याचं कारण सांगतात. सर्वत्र ऑनलाइन व्यवहार होत असल्याने कॅश बाळगत नाहीत, असं लोक सांगतात. शेवटी त्याने बँकेत खातं उघडलं आणि सोबतच ई-वॉलेटदेखील तयार केला. आता गूगल-पे आणि फोन-पे आदीच्या QR CODE च्या माध्यमातून भीक मागतो. त्याने सांगितलं की, बँक खातं उघडण्यास बराच त्रास सहन करावा लागला होता. जेव्हा मी बँकेशी संपर्क केला तर आधार कार्ड आणि पॅन कार्डाची मागणी केली होती. आधार कार्ड माझ्याकडे आधीपासून होता, मात्र पॅन कार्ड तयार करावा लागला. यानंतर गेल्या महिन्यात बेतियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत खातं उघडलं. बँक खातं उघडल्यानंतर ई-वॉलेटदेखील तयार केलं.

First published:
top videos

    Tags: Bihar, Indian railway