रांगजुगल कलाल (डुंगरपूर), 16 मे : आजच्या जगात भुतांवर कोणाचा विश्वास बसू शकेल का हे सांगणे कठीण आहे? सुशिक्षित लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, तर काही लोकांची त्यावर खूप श्रद्धा आहे. जरी, आपण सर्वांनी भूतांशी संबंधित अनेक कथा ऐकल्या असल्या परंतु या घटनांमध्ये तथ्य आहे की लोकांच्या मनाची कल्पना आहे याबाबत कुठेच कोणताच पुरावा नाही.
डुंगरपूरमध्ये विजवा मातेचे मंदिर आहे, जिथे झाडू मारून भुते पळवली जातात. या मंदिरात झाडू वाजवून भुते काढणाऱ्यांजवळ मोठी गर्दी असते. मंदिराबाबत लोकांची अशी समजूत आहे की ज्यांना भूत लागतात त्यांचे या मंदिरात भूत काढले जाते.
अयोध्येतून मोठी बातमी, राम मंदिराचं छत तयार, खास दगड वापरला, स्पेशल PHOTOS
विजवा माता मंदिर हे डुंगरपूर शहरातील गापसागरच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, जे डुंगरपूरमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दुष्ट आत्मा, भूत, पिशाच यापासून मुक्ती मिळण्यासाठी याठिकाणी येतात. याशिवाय या देवीचे व्रत केल्यास अपंगत्व दूर होते आणि रोगांचा नाश होतो, अशीही आख्यायीका आहे.
विजवा मातेला अंबा मातेचे रूप देखील मानले जाते. या मंदिराची ख्याती एवढी आहे की येथे स्थानिकच नव्हे तर शेजारील राज्यातूनही भाविक नवस फेडण्यासाठी येतात. ही देवी भूतांबरोबरच सर्व रोगांचा नाश करणारी मानली जात असली तरी प्रामुख्याने भूत, हात-पायांचे आजार असलेले भक्त मोठ्या संख्येने येतात.
या मंदिरात आल्यावर सापाचे विष निघून जातं, महाभारतापासून आहे संबंध
विजवा मातेच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी यज्ञकुंड बांधले आहे. जवळच एक झाड आहे जिथे प्रदक्षिणा करून भाविक विजया मातेच्या मूर्तीजवळ पोहोचतात. तिथे एक पुजारी हातात मोराच्या पिसांचा झाडू घेऊन बसलेला असतो तो झाडू मारताच भूत निघून जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पूजा करणारे सहसा ब्राह्मण समाजातील आहेत. पण, या मंदिराचे पुजारी आदिवासी असून येथील लोकही मंदिराची देखभाल करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.