Home /News /national /

डॉक्टरांनी मृत घोषित केले; मात्र, मृताला जिवंत करण्यासाठी तासनतास चालला अंधश्रद्धेचा खेळ

डॉक्टरांनी मृत घोषित केले; मात्र, मृताला जिवंत करण्यासाठी तासनतास चालला अंधश्रद्धेचा खेळ

सोमवारी सकाळी विपीन हे त्यांच्या लहान भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत जाण्याच्या तयारीत होते.

    जमुई (बिहार), 6 जून : एकविसाव्या शतकात (21st Century) मानवाने खूप विकास केला आहे. मात्र, तरीही आजही समाजात अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. बिहारमध्ये एका ठिकाणी तेथील स्थानिकांनी अंधश्रद्धेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारच्या जमुई (Bihar Jamui) शहरात घडली. बिहारमधील एका व्यक्तिच्या मृत्यूनंतर तासनतास त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बिहार राज्याच्या जमुई शहरातील लगमा परिसरातील आहे. गावातील मां काली मंदिर (Maa Kali Temple Jamui) परिसराच्या भाविक जेथे थांबतात तिथे शेडमध्ये तरुणाचा मृतदेह ठेवून ग्रामस्थ व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. 40 वर्षीय विपिन कुमार रावत यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता, असे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी विपीन हे त्यांच्या लहान भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत जाण्याच्या तयारीत होते. जनरेटरची तार पेटलेली असताना विजेचा धक्का (Electric Current) लागल्याने ते बेशुद्ध झाला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला सदर रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विपिन यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला असता त्यांच्या हृदयाचे ठोके अजूनही सुरूच असल्याचे कुटुंबीयांना वाटले. हे ऐकल्यानंतर तिथे लोकांची गर्दी झाली. यानंतर त्यांचा मृतदेह काली मंदिर परिसरातील यात्री शेडमध्ये ठेवण्यात आली. यानंतर स्थानिकांनी मृतदेहावर राख आणि लाटणे रगडले. अंधश्रद्धेचा हा प्रकार अनेक तास चालत राहिला. मात्र, विपिन यांच्या निर्जीव शरीरात जीव आला नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही कुटुंबीय व ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात यश आले नाही. यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. हेही वाचा - Unnao : रात्री घरातून बेपत्ता झाली मुलगी, दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर आढळलं भयानक दृश्य मृताचे नातेवाईक विनोद कुमार रावत यांनी सांगितले की, त्यांना विश्वास होता की विपिन जिवंत असेल, त्यामुळे आम्ही त्याला वीजेचा झटका लागल्यानंतर घरगुती उपचार करत होतो. मात्र, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी विपिन यांना मृत घोषित केले असताना, मृताला जिवंत करण्याच्या नावाखाली तासनतास अंधश्रद्धेचा हा खेळ का खेळला गेला, याबाबत विचार करण्याची गरज आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Dead body

    पुढील बातम्या