कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या अंत्यसंस्काराला विरोध, अखेर 2 दिवसांनी दफनविधी

जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइननुसार कोणत्याही कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करायला हवेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइननुसार कोणत्याही कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करायला हवेत.

  • Share this:
    शिलाँग, 16 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसह प्रशासन झटत आहे. डॉक्टर्स त्यांचा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवत आहेत. मात्र याच देवदूतांना समाज योग्य वागणूक देत नसल्याचेही प्रकार समोर आले आहेत. मेघालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अंत्यसंस्कारावरून बरेच वाद निर्माण झाले होते. डॉक्टर जॉन एल सायलो शिलाँगच्या बीथेन रुग्णालयाचे संचालक होते. आणि ते राज्यातील पहिले कोरोना रुग्णही होते. डॉक्टर सायलो यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याच्यावेळी स्मशानभूमीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केला. त्यांना भीती होती की अंत्यसंस्कारावेळी जो धूर निघेल त्यामुळे लोकांना कोरोनाचा संसर्ग होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइननुसार कोणत्याही कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करायला हवेत. डॉक्टर सायलो यांच्यावरही असेच अंत्यसंस्कार होणार होते. त्यानंतर अस्थींचा कलश ख्रिश्चन परंपरेनुसार दफन करण्यात येणार होता. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे असं होऊ शकलं नाही. अखेर सरकार आणि प्रशासनाने त्यांच्या मृतदेहाला दफन केलं. हे वाचा :  IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? SP पत्नीने शेअर केला VIDEO डॉक्टर सायलो 69 वर्षांचे होते. त्यांना अस्थमा आणि मधुमेह होता. सायलो यांच्याशिवाय कुटुंबातील इतर 6 लोकांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. ते सर्वजण शिलाँगमध्ये असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. डॉक्टर सायलो हे शिलाँग आणि गुवाहाटी-शिलाँगच्या दरम्यान असलेल्या नान्गपॉ इथं 2 हॉस्पिटल चालवत होते. सध्या शिलाँग प्रशासन कोरोनाच्या सोर्सची माहिती शोधत असून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करत आहे. त्यांच्या टेस्ट केल्या जात आहेत. यामध्ये डॉक्टर ज्यांच्यावर उपचार करत होते त्यांचाही समावेश आहे. हे वाचा : रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या गरीबांसाठी मास्क बनवतयं RPF जवानाचं कुटुंब
    First published: