Article 370 : आता पाकव्याप्त काश्मिरातल्या लोकांनाही भारतात व्हायचं सामील

भारताच्या घटनेत आम्हालाही प्रतिनिधीत्व मिळावं अशी मागणीही त्यांनी केलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 09:05 PM IST

Article 370 : आता पाकव्याप्त काश्मिरातल्या लोकांनाही भारतात व्हायचं सामील

नवी दिल्ली 6 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरमधूनही भारतात सामील होण्याची मागणी होतेय. PoKतल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलीय. भारताच्या संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan)च्या लोकांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त नागरिकांच्या या मागणीमुळे इम्रान खान सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. काश्मीरमधल्या या भागावर पाकिस्तानने अनधिकृत ताबा मिळविल्याचा भारताचा दावा असून हा भाग भारतात सामील झाल्याशीवाय काश्मीरचा प्रश्न मिटणार नाही अशी भारताची भूमिका आहे.

काँग्रेसच्या या नेत्याने दिला धक्का, काश्मीरबदद्लच्या निर्णयाला पाठिंबा

गिलगिटच्या लोकांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते एच. सेरिंग यांनी एक व्हिडिओ तयार करून गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करत भारतात सामील होण्याची मागणी केलीय. भारताच्या घटनेत आम्हालाही प्रतिनिधीत्व मिळावं अशी मागणीही त्यांनी केलीय. अमित शहा यांनीही आपल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन हा भारतातचाच भाग असल्याचं ठामपणे स्पष्ट केलं होतं.

राज्यसभेनंतर मंगळवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या कलमाचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

Loading...

जम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय

1) जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील.

2) आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील.

3) केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल.

4) जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.

5) कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.

Article 370 : हडबडलेल्या पाकिस्तानने भारताला दिली युद्धाची धमकी

6) आतापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल.

7) देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या.

8) राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल.

9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील.

10) आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...