मराठी बातम्या /बातम्या /देश /

अरे बापरे! या गावातील मुलं विषारी नागासोबत काढतात SELFIE, कारण ऐकून व्हाल हैराण

अरे बापरे! या गावातील मुलं विषारी नागासोबत काढतात SELFIE, कारण ऐकून व्हाल हैराण

नाग (snake) पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते, मात्र एका गावातील आबालवृद्ध विषारी (Poisonous) नागांशी खेळतात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? पण हे खरं आहे.

  • Published by:  desk news
जयपूर, 27 ऑगस्ट : नाग (snake) पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते, मात्र एका गावातील आबालवृद्ध विषारी (Poisonous) नागांशी खेळतात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? पण हे खरं आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) असं एक गाव आहे जिथं सगळेजण अगदी आरामात नागाशी खेळतात, त्याला उचलतात आणि अगदी त्याच्यासोबत सेल्फीदेखील (Selfie) घेतात. नागपूजनाची परंपरा राजस्थानमधील चुरूमध्ये (Churu) अनेकजण नाग हाताळण्यात आणि त्याच्याशी खेळण्यात तरबेज आहेत. इथली मध्ययात त्यांना काहीच विशेष वाटत नाही. नागाविषयीचं या प्रेमामागे दडली आहे इथल्या गोगाजी या देवावरची नितांत श्रद्धा. दरवर्षी या भागात गोगाजींचा उत्सव साजरा केला जातो. गावातील आणि पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येनं या उत्सवाला गर्दी करत असतात. गोगाजींचा हा उत्सव गोगामेडीमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येतो. भजन, कीर्तन आणि भक्तीगीतं गात हा उत्सव साजरा होता. या सोहळ्यात नागरिक वेगवेगळ्या जातीच्या नागांना आणि सापांना हातात घेऊन नृत्य करतात. गुरुवारी रात्री हा उत्सव मोठ्या उत्साहात साजार करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे गेल्या वर्षी या उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यंदादेखील सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळत हा उत्सव साजरा झाला. गोगाजी आणि नागांचा संबंध गोगाजींच्या या उत्सवाला हजेरी लावून आशीर्वाद घेतला, की जगातील कुठलाही साप किंवा नाग त्रास देत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. एकेकाळी लोक नागाला घाबरत असत. मात्र या उत्सवाला हजेरी लावल्यानंतर साप आणि नागाची भीती दूर होत असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आणि त्यानंतर या उत्सवाला गर्दी व्हायला सुरुवात झाली. हे वाचा - केजरीवालांच्या भेटीनंतर सोनू सूद दिल्ली सरकारच्या विशेष कार्यक्रमाचा अ‍ॅम्बेसेडर नागांची होते पूजा महाराष्ट्रातील 32 शिराळ्याप्रमाणे राजस्थानातील चुरुमध्येदेखील नागांची पूजा करण्यात येते. नागांना देव मानून त्यांनी विधिवत पूजा करण्याची प्रथा  गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. आजूबाजूच्या भागात एखाद्या नागरिकाला सर्पदंश झाला आणि त्या व्यक्तीला केवळ गोगाजींच्या स्थानापाशी आणलं तरी तो त्यातून  बरा होत असल्याची श्रद्धा भक्तांमध्ये आहे. गुरु गोरखनाथ यांचे गोगाजी हे शिष्य होते. त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं.
First published:

Tags: Rajasthan, Snake

पुढील बातम्या