Home /News /national /

'या' समस्येमुळे गावातील मुलींशी लग्नाला नकार, कारण वाचल्यावर बसेल धक्का

'या' समस्येमुळे गावातील मुलींशी लग्नाला नकार, कारण वाचल्यावर बसेल धक्का

नैनीताल पासून हे गाव फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे.

  नैनीताल, 29 जून : भारतात अनेक परंपरा आहेत, प्रथा आहेत. अनेक ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रथा असल्यामुळे काही ठिकाणी मुलीचे लग्न केले जात नाही, तर त्या गावातील मुलगीही केली जात नाही. उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात असेच एक गाव आहे, ज्यात गावातील मुलींना लग्नासाठी स्थळ मिळत नाहीये. नैनीतालच्या गैरीखेत (Gairikhet Nainital) गावात असे होत आहे. त्याचे कारण मात्र, फारच विचित्र आहे. ज्यामुळे येथील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. काय आहे कारण - जिल्ह्याच्या शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गावात अजूनही रस्ता (No road to Village) नाही आहे. येथील जनता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच रस्त्याची मागणी करत आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. मात्र, अजूनही या गावात रस्तासुद्धा आलेला नाही. 2012 च्या निवडणुकीतही या गावासाठी रस्त्याचे आश्वासन दिले होते. मात्र. त्यानंतरही रस्ता होऊ शकला नाही, अशी कबुली स्वत: स्थानिक आमदार सरिता आर्य यांनी दिली. गैरीखेत गावातील जनता आजही रस्त्याची मागणी करत आहे. नैनीताल पासून हे गाव फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, येथे रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता तर गावातील मुलींचे लग्नही रस्त्यांअभावी होत नसल्याची भयानक स्थिती आहे. गावातील महिला यामुळे अत्यंत निराश आहेत. बिशनी देवी बिष्ट, पुष्पा आर्या आणि सुशीला देवी या महिलांनी न्यूज़18 सोबत संवाद साधला. ‘निवडणुकीच्या वेळी सर्वजण आश्वासने देतात. मात्र, नंतर कोणालाच आठवत नाही. राजकारणी गरीबांना विसरतात’, अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18ला दिली. हेही वाचा - महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का रस्ता नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत, काय आहेत समस्या?
  1. या मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर असल्याने गावकऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.
  2. अनेक वेळा रूग्णालयात घेऊन जाताना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
  3. भाजीपाला, दूधही रस्त्याअभावी गावात वेळेवर पोहोचत नाही.
  4. बाजारातून गावात सिलेंडर आणण्यासाठी 500 रुपये अतिरिक्त लागतात
  5. पिठाची थैली घरी आणायला 350 रुपये लागतात
  खरे तर गेली अनेक दशके नेते गैरिखेतच्या जनतेला निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देत आहेत, मात्र निवडणुकीनंतर येथे ना आमदार, मंत्री फिरकतात ना त्यांचे कार्यकर्ते. स्त्याअभावी गावातील लोकांचे सातत्याने स्थलांतर होत आहे. तर आमदार सरिता आर्य यांनी 2012 पासून रस्ता देऊ न शकल्याचे स्वत:चे आश्वासन उघड करताना सांगितले की, 'आम्ही रस्ता बांधू शकलो नाही. मात्र, आता आमदार निधीतून गेरिखेतसह जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रस्ता बांधण्यात येणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Marriage, Uttarakhand

  पुढील बातम्या