माणुसकीला काळीमा! दलित परिवाराला करू दिले नाही अंत्यसंस्कार, अर्ध्यातच चिता विझवून बाहेर काढलं शव

माणुसकीला काळीमा! दलित परिवाराला करू दिले नाही अंत्यसंस्कार, अर्ध्यातच चिता विझवून बाहेर काढलं शव

धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला अग्नी देण्यात येणार होता. मात्र या विरोधामुळे चिता विझवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

  • Share this:

हिमांशु त्रिपाठी

आग्रा, 22 जुलै : उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारं आणखी प्रकरणं समोर आलं आहे. आग्रा येथील नाट समाजातील महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी तिचे अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत केले. मृतदेहाला अग्नी देण्याची तयारी सुरू असतानाच गावातील काही लोकं तेथे पोहचले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची अंत्यसंस्कार जबरदस्तीने थांबवल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. स्मशानभूमीत झालेल्या गोंधळानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यानंतही अंत्यसंस्कार झाले नाही. पोलिसांच्या उपस्थितीत असहाय्य नट समाजातील लोकांनी त्या महिलेचे शव घेऊन दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आग्राच्या अछनेरा परिसरातील रायभा इथं घडली. आता या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. 25 वर्षांची पूजा हिचा मृ्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलेचा मृतदेह घेऊन कुटुंबीय स्मशानभूमीत पोहोचले. थोड्याच वेळात ठाकूर समाजातील काही लोक आले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरवात केली. अखेर, त्या महिलेच्या मृतदेहावर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला अग्नी देण्यात येणार होता. मात्र या विरोधामुळे चिता विझवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

वाचा-समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा मागून आला शिकारी शार्क आणि...

आरोपींवर कोणतीही कारवाई नाही

या वादानंतर अछनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा गोंधळ थांबवला, मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत तहसील किरावली गावात नट समाजातील महिलेचा मृतदेह काढून अन्य ठिकाणी अंतिम संस्कार करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे उच्च समाजातील स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्याच्या वादात पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, पीडित कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही, असे आरोप करण्यात येत आहेत.

वाचा-'या' देशात रस्त्यावर पडलाय मृतांचा खच, सडलेल्या अवस्थेत मिळाले 400 मृतदेह

Published by: Priyanka Gawde
First published: July 22, 2020, 10:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या