Home /News /national /

भारतात उभारणार जगातील सर्वात उंच मंदिर, 17 मिनिटांत जमा झाली 40 कोटींची देणगी

भारतात उभारणार जगातील सर्वात उंच मंदिर, 17 मिनिटांत जमा झाली 40 कोटींची देणगी

भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्याठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने देणगी अर्पण करत असतात. मात्र काही मिनिटांमध्ये 40 कोटी देणगी म्हणून जमा होणं तसं अशक्य आहे. 17 मिनिटांमध्ये एवढी देणगी एका मंदिरात दान करण्यात आली आहे.

    अहमदाबाद, 1 मार्च : पण गुजरातमधील एका मंदिर उभारणीसाठी एवढी रक्कम 17 मिनिटांमध्ये जमा झाल्याचं समोर आलं आहे. मंदिर उभारण्याआधी आयोजित करण्यात आलेल्या शिलान्यास कार्यक्रमात एवढी देणगी गोळा झाली. उमिया माताजींचं हे मंदिर आहे, याकरता एकूण 166 कोटींची देणगी गोळा झाली आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या जसपूरमध्ये जगातील सर्वात उंच मंदिर बांधले जाणार आहे. या मंदिरासाठी 110 मिनिटांत म्हणजेच 2 तासांपेक्षा कमी कालावधीत 166 कोटी रुपये दान जमा झालं आहे. अवघ्या 17 मिनिटात मंदिरासाठी 40 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचे सांगण्यात आले. 1000 कोटी रुपये खर्चून उमिया माताजी (Umiya Matajee Mandir) बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वांत उंच मंदिर बांधण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.शनिवारी मंदिराच्या बांधकामासाठी दोन दिवसीय शिलान्यास कार्यक्रम पूर्ण झाला.  हे मंदिर 431 फूट उंच असणार आहे. मंदिराच्या दोन दिवसीय पायाभरणी कार्यक्रमात विश्व उमिया फाउंडेशनन 125 कोटींची आर्थिक मदत गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. (हे वाचा-सुवर्णसंधी! सोनं आणखी 2000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता) शनिवारी हा समारंभ पार पडला तेव्हा 40 कोटी रुपये कमी पडल्याचे दिसून आले. मग मुख्य संयोजक आरपी पटेल यांनी त्यावेळी '40 कोटींची यंत्रणा कमी पडत आहेत' अशी घोषणा केली. यावेळी उपस्थितांकडून आणखी मदत गोळा झाली.  17 मिनिटांमध्ये 40 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आणि मंदिर समितीचं लक्ष्य पूर्ण झालं. अन्य बातम्या भावांचं प्रेम बघा! एकत्र पाणी पिताना दिसले बछडे, वाघिणीनं काढू दिला PHOTO साडीसाठी आले 16 कोटी तरी खरेदी नाही, महिन्याभर इमरती देवींचा संभ्रम कायम रचला इतिहास! महाराष्ट्राच्या डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल पदी
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या