22 जानेवारी : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या उचित सूचना-अपेक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असावा या भूमिकेतून आगामी अर्थसंकल्पाविषयी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राज्याच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ करणे, खर्चाची बचत करणे यासह अस्तित्वात असलेल्या योजना, यंत्रणा, प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना सूचना करता येतील. त्याचप्रमाणे नवीन योजना, यंत्रणा आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठीदेखील आपले अभिप्राय देता येतील. नागरिकांनी 31 जानेवारीपर्यंत www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सूचना पाठवाव्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.