क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’; रुग्णाला भुतबाधा झाल्याच्या अफवेनंतर केला भयावह उपाय

क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’; रुग्णाला भुतबाधा झाल्याच्या अफवेनंतर केला भयावह उपाय

या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरू असलेल्या भुताच्या गोष्टींमुळे लोकांची झोप उडाली आहे

  • Share this:

कोरबा, 28 जून : छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये भुताचा वावर असल्याच्या अफवेमुळे लोक घाबरले आहेत. येथे राहणारे लोक म्हणतात की, त्यांच्या केंद्रातील रहिवासी असलेले काही सहकारी विचित्र वागत आहे.

काही जणांच्या विचित्र वागणुकीमध्ये इतर मजुरांनी भुताची बाधा झाल्याचे समजून तत्सम व्यक्तीला मूत्र प्यायला दिले. सेंटरमधील भुतांच्या चर्चेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या व्यतिरिक्त येथे सेंटरमध्ये असणाऱ्या लोकांच्या तपासणीत होणाऱ्या दिरंगाईसाठी व्यवस्थापनाला दोषी ठरवलं जात आहे.

हे वाचा-आई-बाबा कधी शाळेतचं गेले नाही; पण मुलाने दहावीच्या परीक्षेत केलं टॉप

वास्तविक, संपूर्ण प्रकरण कर्तला ब्लॉकमधील पाठियालापाली हायस्कूलमधील क्वारंटाईन सेंटरमधील आहे. येथील सेंटरमधील लोक भुताच्या अफवेने घाबरले  आहेत. कामगारांचे म्हणणे आहे की, शाळेच्या आवारात भूत आहे, ज्यामुळे त्यांच्यासोबत राहणारे इतर मजूर विचित्रपणे वागत आहेत. एका तरूणाला भुताच्या आत्म्याने वेढले होते, त्यामुळे लोकांनी त्याच्यातील भूत घालण्यासाठी लघवी प्यायला दिली.

हे वाचा-भारतासोबतच्या तणावात चीनला मोठा फटका; महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला

अशा अमानुष कृत्यामुळे लोकांमधील अंधश्रद्धा वाढीस लागत आहे. भुतांच्या भीतीमुळे लोक रात्र-रात्र जागून काढत आहे. क्वारंटाईन केंद्रामध्ये राहणारे लोकांनी सांगितलं की, 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांचे अहवाल आले नाहीत, ज्यामुळे संसर्ग होण्याची भीतीही वाढली आहे.

 

First published: June 28, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading