pensionहरदोई, 10 जानेवारी : वेळेवर पगार, पेंन्शन न मिळाल्याच्या तक्रारी तुम्हीही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत मोठ्या प्रमाणात विसंगती समोर आली आहे, ज्यामध्ये पडताळणीदरम्यान 13 हजार 803 मृत व्यक्तींना स्वर्गात पेन्शन मिळत असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच असे 45 हजार 470 लाभार्थी आढळून आले, जे आपापल्या पत्त्यावर राहत नव्हते. अशा लोकांची पेन्शन रोखण्यात आली असून पडताळणी केल्यानंतरच पेन्शन दिली जाईल, असे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. हरदोई जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 495 पेन्शनधारक आहेत. समाजकल्याण विभागाने वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाबाबत 97 टक्के पडताळणीचे काम पूर्ण केले आहे.
यामध्ये 97 हजार 398 जणांची पडताळणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात निवृत्तीवेतनधारकांची पडताळणी वेळोवेळी केली जाते आणि यावेळी आधार प्रमाणीकरणही केले जात आहे. 3 महिन्यांपूर्वी जिल्हा दंडाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी समाज कल्याण विभागाला 100% पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. पडताळणीदरम्यानच धक्कादायक खुलासे झाले आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजमती यांनी सांगितले की, पडताळणीदरम्यान 13 हजार 803 निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यू झाला असून, त्यांची खाती गोठवण्यात आली आहेत.
वाचा - तरुणीची फ्लॅटमध्येच डिलिव्हरी; नाळ कापताच तान्ह्या बाळाला खिडकीतून दिलं फेकून
हरदोईत मंगळवार ठरला अपघातवार
दुसरीकडे, हरदोई येथे मंगळवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. धुक्यामुळे झालेल्या अपघातात 3 जणांना जीव गमवावा लागला, तर एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. अपघातांच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पहिला अपघात कोतवाली मल्लवन परिसरातील मल्लवन संदिला मार्गावर झाला. दुसरीकडे, दुसरा अपघात हरपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. तिसरा अपघात अरवल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Uttar pardesh