News18 Lokmat

चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या चहा विक्रेत्याला 1 लाख रुपयांचा दंड

ल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेनं चहा कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 01:33 PM IST

चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या चहा विक्रेत्याला 1 लाख रुपयांचा दंड

सिकंदराबाद, 03 मे : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेनं चहा कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. हा व्हिडिओ चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्स्प्रेसमध्ये चित्रीत करण्यात आला होता.

सिकंदराबाद स्थानकाजवळ एक चहा विक्रेता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफीसाठी टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचं या व्हिडिओत दिसत होतं. हा व्हिडिओ मागील वर्षी चित्रीत करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदार पी. शिवप्रसादला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमा शंकर कुमार यांनी दिली.

व्हिडिओत दिसणारा चहा विक्रेता शिवप्रसाद यांच्याकडे काम करतो. चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर करणाऱ्या चहा विक्रेत्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असल्याची माहिती चौकशीतून समोर आलीय. या व्हिडिओमध्ये चहा विक्रेत्यासोबतच दोन फेरीवालेससुद्धा दिसत आहेत. मात्र ते अधनिकृत फेरीवाले असल्याचा दावा रेल्वेनं केलाय.

'दक्षिण मध्य रेल्वेनं अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केलीय. गेल्या काही महिन्यांपासून सिकंदराबाद स्टेशनवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. व्हिडिओत दिसणाऱ्या दोन अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आलीय,' अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...