वयाच्या 7 व्या वर्षी घेतला होता स्वामी विश्वेश तीर्थ यांनी संन्यास, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

वयाच्या 7 व्या वर्षी घेतला होता स्वामी विश्वेश तीर्थ यांनी संन्यास, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

स्वामी विश्वेश तीर्थ यांचं दीर्घ आजारानं रविवारी सकाळी निधन झालं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • Share this:

बंगळुरू, 29 डिसेंबर: पेजावर मठाचे स्वामी विश्वेश तीर्थ यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्नाटकातील आश्रमात रविवारी सकाळी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत स्वामी विश्वेश तीर्थ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासह अनेक दिग्गजांनी विश्वेश तीर्थ स्वामींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. द्वैत तत्वज्ञानाच्या पेजावर मठाचे ते 32 वे प्रमुख होते. काही दिवसांपासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. राज्य सरकारने 29 ते 31 डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय शोक जाहीर केला आहे.

विश्वेश स्वामी यांचे पार्थिव भक्तांच्या दर्शनासाठी उड्डपीच्या महात्मा गांधी मैदानात ठेवण्यात आलं आहे. दर्शन पूर्ण झाल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती मठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा-'देशातल्या सर्व नेत्यांनी हेमंत सोरेन यांचा आदर्श घ्यावा', युजर्सची प्रतिक्रिया

सात वर्षांचे असताना घेतला संन्यास

स्वामी विश्वेश तीर्थ यांचा जन्म 1931 रोजी शिवली माधव ब्राह्मण कुटुंबात झाला होता. संन्यास घेण्याआधी त्यांचं नाव व्यंकट होतं. 1938 साली वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. त्यांचे गुरू श्री भंडारकेरी मठाचे विद्वान तीरथू होते. नंतर विश्वेश तीर्थ पेजावर मठाचे जगप्रसिद्ध तीर्थ बनले. स्वामी तीर्थ हिंदू धर्माच्या द्वैतवादी सिद्धांताचे उपासक होते आणि कृष्ण भक्त होते. 1954 साली त्यांनी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात पहिले पर्याय (मठेशी संबंधित धार्मिक प्रथा) केले. त्याच वर्षी त्यांनी उडुपी येथे माधव परिषदही आयोजित केली होती. त्याचप्रमाणे, 1968 साली दुसऱ्यांदा पर्याय केला होता. त्यांनी आयुष्यात पाच पर्याय प्राप्त केला आहे.

स्वामी अनेक संस्थांसोबत संबंधीत होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. स्वामीजींनी सुरू केलेल्या अखिल भारत माधव महामंडळाच्या केंद्राने अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. माधव महामंडळाची अनेक वसतिगृहे संपूर्ण कर्नाटकात पसरलेली आहेत. या वसतिगृहांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. आणि सामान्य विद्यार्थ्यांकडूनही अगदी सामान्य शुल्क आकारले जाते. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या मठांची केंद्रं स्थापन केली. स्वामी विश्वेश तीर्थ यांना सामाजिक कार्यामुळे राष्ट्रीय संत म्हणूनही मान्यता मिळाली आहे.

वाचा-शरद पवार झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जाणार नाहीत, कारण...

Published by: Kranti Kanetkar
First published: December 29, 2019, 4:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading