घटनेच्या प्रती फाडणाऱ्या पीडीपी नेत्यांचं नागरिकत्व होऊ शकतं रद्द

घटनेच्या प्रती फाडणाऱ्या पीडीपी नेत्यांचं नागरिकत्व होऊ शकतं रद्द

काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात काश्मीरमधल्या खासदारांनी निदर्शनं केली. पीडीपीचे खासदार एम. एम. फैयाज आणि नाजिर अहमद यांनी राज्यसभेत घटनेच्या प्रती फाडल्या. त्यांच्यावर आता कारवाई होणार असून त्यांनी 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचं नागरिकत्वही रद्द होऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात काश्मीरमधल्या खासदारांनी निदर्शनं केली. पीडीपीचे खासदार एम. एम. फैयाज आणि नाजिर अहमद यांनी राज्यसभेत घटनेच्या प्रती फाडल्या. त्यांच्यावर आता कारवाई होणार असून त्यांनी 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचं नागरिकत्वही रद्द होऊ शकतं.

राज्यघटनेत नमूद केल्यानुसार राष्ट्रीय ध्वज आणि राज्यघटना जाळणं, फाडणं किंवा कोणत्याही पद्धतीने त्याचा अपमान करणं हा गुन्हा आहे. त्यानुसारच काश्मीरच्या या खासदारांवर कारवाई होऊ शकते.

राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान

भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्येही याचा उल्लेख आहे. राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर घटना आणि तिरंग्याचा अपमान करू शकत नाही.

गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 आणि काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवला तेव्हा राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्याचवेळी पीडीपीच्या खासदारांनी राज्यघटनेच्या प्रती फाडल्या. यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना बाहेर जायला सांगितलं.

कपड्यांचीही फाडाफाड

यानंतर या दोन्ही खासदारांनी दंडावर काळी पट्टी लावून आपली निदर्शनं सुरूच ठेवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एम. एम. फैयाज यांनी तर त्यांचा कुर्ताही फाडला. काश्मीरमधले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी या दोन्ही खासदारांवर जोरदार टीका केली. घटनेच्या रक्षणासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू, असंही ते म्हणाले.

काश्मीरमधल्या पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

कलम 370चा काँग्रेसला झटका, विरोध केल्यानं या ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

======================================================================================================

असा असेल भारताचा नवा नकाशा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या