दिल्लीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमधले मतभेट चव्हाट्यावर

दिल्लीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमधले मतभेट चव्हाट्यावर

  • Share this:

प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली 12 फेब्रुवारी :  आम आदमी पक्षाने दिल्लीत जोरदार पुनरागमन केले आहे. 70 पैकी 62 जागा जिंकून केजरीवाल  तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा दिल्लीत काँग्रेस आपलं खातं उघडू शकला नाही. याबद्दल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. आता कॉंग्रेसच्याच नेत्यांनी पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरवात केली आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राज्य कॉंग्रेस कमिटी बंद करण्याची मागणी केली आहे.  तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुडा यांनीही पक्षाने आत्मपरिक्षण करावे असं मत व्यक्त केल्याने काँग्रेसमधले मतभेद उघड झाले आहेत. दिल्लीत काँग्रेसला  आपलं खातही उघडता आलं नाही. तब्बल 67 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलंय की,  'सर, मला एवढेच जाणून घ्यायचे आहे की, कॉंग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षांना राज्यांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी आउटसोर्स करीत आहे का?  जर नसेल तर आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल तुम्हाला अभिमान का आहे? आणि जर तसे असेल तर आपण राज्य कॉंग्रेस कमिटी बंद केली पाहिजे. काँग्रेसचे दिल्ली प्रभारी पी.सी. चाको यांनी निकालानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. शीला दीक्षित या मुख्यमंत्री असतानाच दिल्लीत काँग्रेसला उतरती कळा लागली होती असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरही मोठा वाद निर्माण झालाय.

अरविंद केजरीवाल 'व्हॅलेंटाईन डे'ला नाही तर या दिवशी घेणार शपथ

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयाला विरोधकांना उत्तेजन देणारे निकाल म्हटले होते. चिदंबरम म्हणाले की, लक्षात ठेवा, जेव्हा दिल्लीत मतदान झाले तेव्हा मल्याळी, तामिळ, तेलगू, बंगाली, गुजराती आणि भारतातील इतर राज्यांत कोट्यवधी लोकांनी मतदान केले होते.

दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सवलती बंद करा, शिवसेना खासदाराचा प्रस्ताव

आम्हाला दिल्लीत पुन्हा एकदा नाकारण्यात आल्याचे सांगत कॉंग्रेस  नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी म्हणालया,  आता कधी आत्मनिरीक्षण करतील, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. याबाबत पक्षाध्यक्षांनी लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

सर्वोच्च स्तरावर निर्णय घेण्यास उशीर होणे, राज्य पातळीवर रणनीती आणि एकतेचा अभाव, कामगारांचा आत्मविश्वास गमावणे, जमीनी स्तरावर पकड नसणे. या गोष्टींवर काम करणं करजेचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मी माझ्या जबाबदारीपासून पळ काढत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

First published: February 12, 2020, 2:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या