चीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन

चीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन

भारताचा आज जितका जीडीपी आहे तो 60 च्या दशकात जपानचा होता. पुढील काही वर्षात भारत सुद्धा जपानप्रमाणे विकसित देशामध्ये शामील होईल.

  • Share this:

17 मार्च : चीनची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे आता ती कमी होईल. चीनचा आर्थिक विकासाचा दर कमी होईल. याचा भारताला फायदा होईल. भारताची काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे याचा परिणाम भारताच्या विकासावर होईल आणि भारत सुपर पाॅवर बनेल असा विश्वास नोबेल विजेते पाॅल क्रुगमन यांनी व्यक्त केला.

न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटच्या आज दुसऱ्या दिवशी नोबेल विजेते पाॅल क्रुमन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताच्या स्वांतत्र्याच्या 35 वर्षांनंतर भारताचा हवा तसा विकास झाला नाही अशी खंत व्यक्त केली.

तसंच भारतावर 200 वर्षांपर्यंत इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्षांमध्ये जे मिळवलं ते भारताने फक्त 30 वर्षांमध्ये मिळवलं. हा विकास साधारण नाही. हा एक मोठा देश आहे. भारताने जपानला मागे टाकलंय. भारत फक्त यूएस आणि चीनच्या मागे आहे आणि युरोपियन देशापेक्षा पुढे आहे. भारत एक सुपर पाॅवर देश आहे असा विश्वासही पाॅल क्रुगमन यांनी व्यक्त केला.

भारत आणि चीनची अर्थव्यवस्थावर पाॅल क्रुगमन म्हणाले, लोकं नेहमी चीन बदल बोलतात पण भारत सुद्धा याचा भाग आहे. भारतात अजूनही गरिबी आहे पण पहिल्यासारखी परिस्थिती नाही. भारताचा जीडीपी हा अमेरिकेच्या तुलनेत 12 टक्के आहे. हा कमी असून पहिले 4 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारताचा आज जितका जीडीपी आहे तो 60 च्या दशकात जपानचा होता. पुढील काही वर्षात भारत सुद्धा जपानप्रमाणे विकसित देशामध्ये शामील होईल.

First published: March 17, 2018, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading