Home /News /national /

Breaking News : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनाला आग, पाहा Live Video

Breaking News : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनाला आग, पाहा Live Video

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानानं पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला. या विमानात 185 प्रवासी होते.

    मुंबई, 19 जून :  पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानानं पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानात 185 प्रवासी होते. विमानानं उड्डाण घेताच ते पेटल्यानं पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला होता. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पायलटनं प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ ठळला आहे. पटनामधील अधिकाऱ्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार विमानानं उड्डाण घेताच त्यामधील इंजिनातून धूर बाहेर पडत असल्याचं आढळलं. यानंतर विमान तात्काळ सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहे. विमानाच्या इंजिनाला आग का लागली हे अद्याप समजलेलं नाही. विमानतळाच्या बाहेर रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. कोणतीही गरज पडली तर मेडिकल ट्रिटमेंट देण्यासाठी सुविधा सज्ज आहे. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील बोलवण्यात आल्या आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Airplane, Fire

    पुढील बातम्या