मराठी बातम्या /बातम्या /देश /पक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा

पक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा

" मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली नाही तर देशासोबत प्रामाणिकता दाखवली आहे "

" मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली नाही तर देशासोबत प्रामाणिकता दाखवली आहे "

" मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली नाही तर देशासोबत प्रामाणिकता दाखवली आहे "

   21 एप्रिल : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पण भाजपचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र भाजप पक्ष सोडण्यास नकार दिलाय.

  भाजप सरकारच्या विरोधात पाटनामध्ये विरोधक एकवटले आहे. या मेळाव्यात यशवंत सिन्हांनी भाजप सोडण्याची घोषणा केली. शत्रुघ्न सिन्हांही भाजप सोडतील अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही. मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली नाही तर देशासोबत प्रामाणिकता दाखवली आहे असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

  तसंच त्यांनी आपल्याच पक्षाची खिल्लीही उडवली. दिल्लीत आमचा पक्ष स्कूटर पार्टी झालाय. आम्हीच वाट पाहतोय ही पक्ष कधी आम्हाला सोडून देईल असं सिन्हा म्हणाले.

  तर दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचं तोंडभरून कौतुकही केलं. लालूंना भेटण्यासाठी आपण जेलमध्ये जाण्यासाठीही तयार आहे असा दावाच सिन्हांनी केला.

  First published:
  top videos

   Tags: BJP, Shatrughan sinha