परीक्षेत अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून करत होता कॉपी, असा गेला बाराच्या भावात

परीक्षेत अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून करत होता कॉपी, असा गेला बाराच्या भावात

शिपाई पदाच्या परीक्षेत तरुणानं कॉपी करण्याची अशा काही भन्नाट पद्धत वापरली की शिक्षकही अवाक झाले.

  • Share this:

पटना, 03 फेब्रुवारी: परीक्षा केंद्रात कॉपी होण्याची गोष्ट काही नवीन नाही मात्र वेगवेगळ्या मार्गानं कॉपी होत असलेली पकडलीही जाते हे मात्र वारंवार परीक्षार्थी विसरत असतात. हे सांगायचं कारण म्हणजे एका युवकानं कॉपी करण्याची भन्नाट आयडिया शोधून काढली खरी मात्र पर्यावेक्षकांच्या नजरेतून मात्र तो सुटू शकला नाही. त्याची ही भन्नाट आयडिया पकडली गेली आणि ते चक्रावले. शिपाई पदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या युवकानं चक्क आपल्या अंडरवेअरमध्ये मोबाईल आणि टोपीखाली ब्लूटुथ लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा परीक्षा देणारा तरुण जमुईमधील लक्ष्मीपूर इथला रहिवासी आहे. हा तरुण शिपाई पदाच्या परीक्षेसाठी इंद्रस्थली बालिका उच्च विद्यालयात बसला होता. प्रश्न पत्रिका मिळाल्यानंतर काही वेळ तो तसाच शांत बसून होता. मात्र काहीवेळानं त्याच्या हलचाली वेगानं सुरू झाल्या. वर्गात असलेल्या शिक्षकांसह पर्यावेक्षकांना शंका आली. त्यांनी परीक्षा देणाऱ्या तरुणाला जागेवरून उठवलं त्याची झडती घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-काय सांगता! डेटॉलचे लिक्विड कोरोना व्हायरसचा खात्मा करू शकतात?

झडतीनंतर समोर आली धक्कादायक गोष्ट

पर्यावेक्षकांनी घेतलेल्या झडतीमध्ये तरुणाच्या अंडरवेअरमध्ये मोबाईल तर डोक्यावरील टोपीमध्ये ब्लूटुथ सापडलं. कसून चौकशी केल्यानंतर तरुण फोनवर प्रश्न सांगत असल्याचं आणि पलिकडून फोनवर कोणीतरी अज्ञात व्यक्ती उत्तर सांगत असल्याची बाब समोर आली. ह्या प्रकरणाची तक्रार दीघा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर तरुण प्रश्न पत्रिका घेऊन फरार झाला. तर परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तरुण मोबाईल, ब्लूटुथ परीक्षा हॉलमध्ये घेऊन आला कसा हा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा-शरजील इमामच्या समर्थनासाठी मुंबईत घोषणाबाजी, फडणवीसांनी शेअर केला VIDEO

First published: February 3, 2020, 12:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या