लालू प्रसादच्या घरी 'हाय होल्टेज' ड्रामा, राबडीदेवींनी मारहाण केल्याचा सुनेचा आरोप

लालू प्रसादच्या घरी 'हाय होल्टेज' ड्रामा, राबडीदेवींनी मारहाण केल्याचा सुनेचा आरोप

तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांचं लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनीच तेजप्रताप यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. तेव्हापासून ते दोघे वेगळे राहतात.

  • Share this:

पाटना 15 डिसेंबर : निवडणुकीत सतत होणारा पराभव, लालू प्रसाद यादव यांचा तुरुंगवास यामुळे ऐकेकाळी बिहारवर वर्चस्व गाजविणाऱ्या लालू प्रसादांच्या घरी यादवी माजलीय. रविवारी पाटण्यातल्या त्यांच्या घरी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप याची बायको ऐश्वर्या हिने राबडी देवीने मारहाण करत घराबाहेर हाकलल्याचा आरोप केला. ऐश्वर्याच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली. राबडी देवी या पाटण्यातल्या 10 सर्कुलर रोड इथं राहतात. दुपारी त्यांच्या सुनेने असे आरोप करतातच पोलीस त्यांच्या घरी दाखल झाली. तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांचं लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनीच तेजप्रताप यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. तेव्हापासून ते दोघे वेगळे राहतात.

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

त्यानंतर वादाला सुरुवात झाली. लालू यांची मुलगी मीसा भारती यांनीही मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्या यांनी या आधी केला होता. मात्र राजदचे आमदार शक्ति सिंह यादव यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. त्या वेळी मी घटनास्थळी उपस्थित होतो. असं काहीही घडलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय आहे यादव कुटुंबात भांडण?

तेजप्रताप यादव यांच्यामुळे आधीच लालूप्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत आलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर आरोप करून तिच्याशी घटस्फोट घेण्याचा दावा दाखल केला होता. सोशल मीडियातून ते वारंवार वेगवेगळी वक्तव्य करत असतात. एकीकडे घटस्फोटाचा दावा करायचा आणि दुसरीकडे, मी राधेच्या शोधात आहे, असं म्हणायचं यामुळे ते वादात सापडले होते.

गायी आणि बासरी

याआधी, तेजप्रताप यादव यांनी शंकराचं आणि कृष्णाचं रूप घेतल्यामुळेही ते चांगलेच चर्चेत होते. त्यांनी मथुरेचा दौरा करून कान्हाचं रूप धारण केलं होतं. गायींच्या मध्ये उभं राहून बासरी वाजवतानाचा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेजप्रताप यादव यांनी कुरुक्षेत्राचाही दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याचीही जोरदार चर्चा झाली.

'चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते'

तेजप्रताप यादव आता पुन्हा निवडणुकांच्या कुरुक्षेत्रात उतरले आहेत. आपल्या दोन उमेदवारांची नावं घोषित करून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये दबावाचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलामध्ये जोरदार यादवी माजली आहे.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2019, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading