...हे तर नितीशकुमार आणि मोदींचं सेटिंग होतं -लालू प्रसाद यादव

...हे तर नितीशकुमार आणि मोदींचं सेटिंग होतं -लालू प्रसाद यादव

नितीशकुमार राजीनामा काय देता आणि पंतप्रधान मोदी टिवट् काय करता हे सगळं नियोजित होतं अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.

  • Share this:

26 जुलै : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी जोरदार नितीशकुमारांवर सडकून टीका केलीये.   नितीशकुमार हे भ्रष्टाचारावर बोलताय पण तेच एका प्रकरणात आरोपी आहे असा घणाघाती आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला. तसंच नितीशकुमार राजीनामा काय देता आणि पंतप्रधान मोदी टिवट् काय करता हे सगळं नियोजित होतं अशी टीकाही त्यांनी केली.

लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीशकुमारांचा चांगलाच समाचार घेतला.  नितीशकुमार स्वत: कलम 302 अंतर्गत गुन्ह्यात अडकलेले आहे. आणि ते आज भ्रष्टाचारावर बोलताय.

ते जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा माझ्यावरही चारा घोटाळ्यात आरोपपत्र दाखल झालं होतं पण तरीही मी त्यांच्यासोबत गेलो असं लालूप्रसाद यादव म्हणाले.

नितीशकुमार यांचा राजीनामा ड्रामा हा पहिल्यापासून नियोजित होता. त्यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधान मोदी यांनी टि्वट करून अभिनंदन केलं. ही सगळी सेटिंग होती अशी टीका करत त्यांनी नितीशकुमारांविरोधातले गुन्ह्याची कागदंही दाखवली.

महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त राजीनामा दिलाय. पण आमची युती अजून तुटली नाही. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही असंही लालू प्रसाद यादव म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 09:10 PM IST

ताज्या बातम्या