06 एप्रिल : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव हा पुढच्या महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. तेज प्रताप यादव याचा विवाह आरजेडीचे नेते आणि बिहार सरकारचे मंत्री चंद्रिका राय यांच्या मुलीशी होणार आहे. आता तिच्या नावाची गंम्मत म्हणजे तिचं नाव ऐश्वर्या राय असं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 12 मे रोजी हे दोघेही विवाह बंधनात बांधले जाणार आहे.
कोण आहे ऐश्वर्या राय ?
- ऐश्वर्या राय ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे. दरोगा राय यांचे पुत्र चंद्रिका राय हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते.
- ऐश्वर्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. या सगळ्यांत ती मोठी आहे.
- ऐश्वर्याचं शिक्षण पटनाच्या नॉट्रेडम शाळेत झालं. पुढचं शिक्षण तिने दिल्लीत पुर्ण केलं.
दरम्यान, चार वर्षांनंतर लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांमध्ये हा मोठा सोहळा पार पडणार आहे. याआधी 2014मध्ये, लालु प्रसाद यांची छोटी मुलगी राज लक्ष्मी हीचा मुलायमसिंह यांच्या नातीशी विवाह केला होता.
पण चारा घोटाळ्या अनेक प्रकरणात लालू प्रसाद हे दोषी आहेत. त्यांना 14 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण आता मुलाच्या लग्नासाठी लालूंना परवाणगी मिळणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Fiance, Laalu parasad yadav, Marriage, Patna, Tej pratap yadav