सावरकरांच्या टीकेवरून भाजपचा राहुल गांधींवर सर्वात मोठा पलटवार

सावरकरांच्या टीकेवरून भाजपचा राहुल गांधींवर सर्वात मोठा पलटवार

'या आधीही अनेकांनी देशाला लुटलं. आता हे चालणार नाही. त्यासाठी अंगात शुद्ध रक्त पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली 14 डिसेंबर : दिल्लीत झालेल्या भारत बचाओ रॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागण्याच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्ला केला होता. 'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीत भाजपवर जोरदार घणाघात केला होता. त्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, उधारीचं गांधी हे आडनाव लावून कुणी देशभक्त होत नाही. त्यासाठी शरीरात शुद्ध देशी रक्त असावं लागतं. गिरीराज सिंग यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गिरीराज सिंग यांनी ट्वीट करत ही टीका केलीय, वीर सावरकर देशभक्त होते. उधारीचं आडनाव घेत कुणी देशभक्त होत नाही. या आधीही अनेकांनी देशाला लुटलं. आता हे चालणार नाही असंही ते म्हणाले.

दादा, तुम्ही DCM झालंच पाहिजे, कार्यकर्त्याच्या मागणीला अजित पवारांचं हे उत्तर

शनिवारी सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी, प्रियांका यांनी भाजपच्या 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर टीका केली. भाजप आहे तर देशात बेरोजगारी, महाग कांदा आणि 4 कोटी नोकऱ्या संपुष्टात येणे शक्य असल्याचे प्रियांका यांनी यावेळी सांगत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी 'रेप इन इंडिया' वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान, मी माफी मागणार नाही, माफी मागायची असेल तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, असे खडेबोल राहुल गांधी यांनी सुनावले.

संघाच्या 'तरुण भारत'मधून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर खोचक टीका

शेतकरी, कामगारांशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. देशाच्या तरुणाच्या हातात रोजगार असेल तर विकास होईल. राष्ट्रीय विकासदर 9 टक्क्यांवरून थेट 4.5 टक्क्यांवर आणला. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी होती. शत्रुंनी नाहीतर नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था कमकुवत केली. गेल्या 5 वर्षांत अदाणींना 1 लाख कोटींहून अधिक किमतीची कंत्राट दिली. कर जनतेकडून घेतला, कर्जमाफी मात्र उद्योपतींना दिली. मोदी सरकारने आतापर्यंत उद्योगपतींचे 60 लाख कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2019, 4:25 PM IST

ताज्या बातम्या