रोखला होता अडवाणींचा रथ,आज मिळालं मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद

विशेष म्हणजे या 9 मंत्र्यापैकी एक राज्यमंत्री हे एकेकाळचे कडक आयएएस अधिकारी होती. त्यांनी अडवाणींच्या अयोध्या रथ यात्रेचा रथ रोखला होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2017 01:10 PM IST

रोखला होता अडवाणींचा रथ,आज मिळालं मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद

03 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिंडळाचा आज तिसऱ्यांदा खांदेपालट झाला. 9 नवीन राज्यमंत्र्यांचा यात समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे या 9 मंत्र्यापैकी एक राज्यमंत्री हे एकेकाळचे कडक आयएएस अधिकारी होती. त्यांनी अडवाणींच्या अयोध्या रथ यात्रेचा रथ रोखला होता. त्यांचं नाव आहे राजकुमार (आर.के.) सिंह.

64 वर्षांचे आर.के.सिंह 2013 साली केंद्रीय गृहसचिव पदावरून निवृत्त झाले. जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा सोमनाथहून निघाली होती. तेव्हा अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्याचे आदेश बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी दिले होते. तेव्हा समस्तीपूरचे जिल्हाधिकारी असलेल्या सिंह यांनी रथयात्रा रोखण्यात आणि अडवाणींना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट आणि समझोता एक्स्प्रेस प्रकरणात संघाशी निगडीत संस्था असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

निवृत्त झाल्यानंतर सिंह राजकारणात सक्रीय झाले. 2014मध्ये भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले.

सिंह यांनी केंद्रीय गृह सचिवपदही भूषवलंय. त्यासोबतच त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावरुन कारभार पाहिलाय.

Loading...

सिंह हे मुळचे बिहारच्या सुपौल जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. ते 1975च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयएएस आहेत. नोकरशाह असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. सध्या ते आराहून खासदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...