ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, काही प्रवासी जखमी

ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, काही प्रवासी जखमी

बिहारमधील छपराजवळ ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे (छपरा-सूरत एक्स्प्रेस) 14 डबे रुळावरुन घसरले.

  • Share this:

छपरा, 31 मार्च: बिहारमधील छपराजवळ ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे (छपरा-सूरत एक्स्प्रेस) 14 डबे रुळावरुन घसरले. या घटनेत 4 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गौतम स्थान रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8च्या सुमारास ही गाडी छपरा रेल्वे स्थानकातून निघाली होती. त्यानंतर गौतम रेल्वे स्थानकाजवळ डबे घसरले.

घटनेचे वृत्त कळताच रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे मार्गावरील काही गाड्या लेट होऊ शकतात. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 10:54 AM IST

ताज्या बातम्या