पाकिस्तानने युद्धाची चूक केली तर उद्धवस्त करून टाकू- राजनाथ सिंग

पाकिस्तानने युद्धाची चूक केली तर उद्धवस्त करून टाकू- राजनाथ सिंग

भारताची सहनशक्ती आता संपली असून दहशतवाद आता सहन केला जाणार नाही.

  • Share this:

पाटना 22 सप्टेंबर : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिलाय. पाकिस्तानने 1965 आणि 71 सारखी युद्धाची चूक केली तर पाकिस्तान उद्धवस्त होईल अशी धमकीच त्यांनी दिली. भारताची सहनशक्ती आता संपली असून दहशतवाद आता सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. पाटण्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हा इशारा दिला. पाकिस्तानसोबतची चर्चा आता फक्त पाक व्याप्त काश्मीरवरच होईल असंही ते म्हणाले. पाकिस्तानने आगावूपणा केलाच तर त्याला उद्धवस्त होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असंही ते म्हणाले.

राजनाथसिंग पुढे म्हणाले, पाकिस्तान गेली अनेक दशकं दहशतवाद्यांना पोसते आहे. त्यांना मदत करत आहे. त्यामुळे भारतातचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबविणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी बातचित नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि आम्ही त्यावर कायम आहोत. केंद्र सरकारच्या या लढाईत काँग्रेसची मात्र साथ मिळत नाहीये. काँग्रेस सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमित शहांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेना अजूनही वेटिंगवरच!

ते म्हणाले, कलम 370 ला विरोध करून काँग्रेसने काय मिळवलं. या कलमामुळे फक्त दहशतवाद वाढला आहे. त्याला राज्याला काहीही मिळालं नाही. येत्या पाच वर्षात काश्मीर जगाचा स्वर्ग बनेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या प्रश्नावर फक्त राजकीय पक्षांनीच नाही तर सर्व देशाने एकाच भाषेत बोललं पाहिजे मात्र काँग्रेसची भूमिका वेगळी आहे असा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती घसरली

जियो न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या ऑडिट रिपोर्टनुसार 18 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तान एअरलाईन्स (पीआयए) गेल्या काही दिवसांपासून विमानात प्रवासी नसताना विमान उडवत आहेत. मुख्य म्हणजे पीआईएनं एक किंवा दोन नाही तर चक्क 82 रिकामी विमानं उडवली आहेत. सरकारी कंपनीच्या या घोटाळ्यानं जवळ जवळ 18 कोटींचे नुकसान झाले आहे.

थेट 'राजां'च्या बालेकिल्ल्यात जाऊन शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा!

जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय विमान सेवानं इस्लामाबादहून रवाना होत हवेत काही काळ घालवत पुन्हा इस्लामाबादमध्येच विमान उतरवले. पीआयएनं एक-दोन नाही तर चक्क 82वेळा असा प्रकार केला. रिपोर्टनुसार 2016-2017मध्ये 46 विमानांचे उड्डाण केले, यात एकही प्रवासी विमानातून प्रवास करत नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हज येथे जाणारी 36 विमाने रिकामी होती. यामुळं पीआयएला 18 कोटींचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सरकार काही दिवसांनंतर चौकशी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 09:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading