बिहारमध्ये NDA चं अखेर जमलं, अमित शहांचा जीव भांड्यात!

बिहारमध्ये NDA चं अखेर जमलं, अमित शहांचा जीव भांड्यात!

कुठल्या जागेवर कुणी लढायचं हे लवकरच चर्चा करून सोडवू असं अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

  • Share this:

पाटना 23 डिसेंबर : महाआघाडी मजबूत होत असतान भाजपच्या नेतृत्वाखालील NDAलाही थोडा दिलासा मिळालाय. होय, नाही म्हणता म्हणता रामविलास पासवान यांची नाराजी दूर झाली आणि सर्व पक्षांनी एकत्र लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमित शहांना दिलासा मिळाला असून भाजपचा जीव भांड्यात पडलाय.


केंद्रीय मंत्री राम विलास पासवान हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. बिहारमध्ये पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या पाठोपाठ पासवानही NDAपासून दूर जातात की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी वेगाने हालचाली करत त्यांची नाराजी दूर केली.


रविवारी अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांच्यासोबत चर्चा केला. बिहारमधल्या 34 लोकसभा जागांपैकी 17 जागा भाजप आणि 17 जागा जेडीयू मिळून लढणार आहेत. तर भाजपच्या कोट्यातून 6 जागा पासवान यांच्या पक्षाला दिल्या जाणार आहेत. कुठल्या जागेवर कुणी लढायचं हे लवकरच चर्चा  करून सोडवू असं अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.


आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जिंकू असं नितीश कुमार यांनी म्हटलंय. तर नाराजी दूर झाली असून आता कुठलाही प्रश्न नाही असं पासवान यांनी स्पष्ट केलं.
 

VIDEO : संतप्त महिलांनी केली पोलिसांची पळता भुई थोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 03:06 PM IST

ताज्या बातम्या