मराठी बातम्या /बातम्या /देश /

वडिलांची सुरु होती कॅन्सरशी झुंज, 18 वर्षाच्या मुलानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप

वडिलांची सुरु होती कॅन्सरशी झुंज, 18 वर्षाच्या मुलानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप

अभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातलं वातावरण बदललं अभिनवनं या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.

    पाटणा, 26 डिसेंबर :   घरातली, सभोवतालची परिस्थिती कितीही बिकट असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करता येते. शून्यातून विश्व निर्माण करणारी, संकटाला शरण न जाता यश खेचून आणणारी अनेक उदाहरणं आपण पाहतो. 18 वर्षाच्या एका तरुणानंही एक असंच उदाहरण जगासमोर ठेवले आहे. या तरुणाला अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठाची दोन कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. त्याचं हे निव्वळ यश देखील कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर घरात वडिलांची कॅन्सरशी झुंज सुरु असताना त्यानं जिद्दीनं ही स्कॉलरशिप पटकावली आहे.  त्यामुळे त्याची ही उपलब्धी सर्वांसाठी अभिमानास्पद ठरते. अभिनव खन्ना असं या 18 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. अभिनव बिहार (Bihar) मधील पाटणाचा (Patna) रहिवाशी आहे. अभिनवला अमेरिकेतील ओहियोमधील (Ohio)  केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची (Case Western Reserve University) 2 कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. अभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातलं वातावरण बदललं अभिनवनं या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. अमेरिकन विद्यापीठाचा इतिहास काय? अभिनवला ओहियोमधील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली आहे. हे विद्यापीठ अमेरिकेतील आघाडीचं संशोधन विद्यापीठ आहे. याची स्थापना 1826 साली झाली आहे. या विद्यापीठानं तब्बल 17 नोबेल पुरस्कार विजेते जगाला दिले आहेत. अभिनवला या विद्यापीठाच्या पदवीपूर्व (Undergraduate) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या विभागाच्या प्रमुखांनी त्याला तसे पत्र पाठवले आहे. ‘अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठात प्रवेशाचं हे निमंत्रण आहे. हे निमंत्रण म्हणजे तुझ्या उत्तम शैक्षणिक आणि वैयक्तिक यशाचं प्रतिक आहे. या विद्यापीठातही तू उत्तम यश संपादन करशील असा प्रवेश समितीला विश्वास वाटतो,’’ असे पत्र त्यांनी अभिनवला लिहिले आहे. अभिनवला चार वर्षांसाठी 2 कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. या स्कॉलरशिपमधून त्याच्या चार वर्षांच्या शिक्षणासह सर्व खर्च होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Education

    पुढील बातम्या