निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी पुन्हा लांबणीवर पडणार

निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी पुन्हा लांबणीवर पडणार

निर्भया प्रकरणी 7 वर्षानंतरही शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे न्याय केव्हा मिळणार असा सवाल विचारला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली 18 डिसेंबर : देभभर गाजलेल्या निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी लाबंणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाने आरोपींच्या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पातियाळा कोर्टातली सुनावणी आता लांबणीवर पडलीय. प्रकरणातल्या सर्व आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करणारी याचिका निर्णयाच्या आईचे कोर्टात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटलंय की आरोपींनी राष्ट्रपतींकडे दाखल केलेल्या दयेंच्या सर्व याचिका फेटाळल्या गेल्यानंतरच अशा प्रकारचं डेथ वॉरंट काढता येतं. त्यामुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 जानेवारीला होणार आहे.

हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधी 9 महिलांना बलात्कार करून जाळलं

राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळल्यानंतरही काही दिवस आरोपींना दिले जातात. मात्र त्याबाबत त्यांना माहिती दिली जात नाही. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आरोपींना लवकर शिक्षा होत नसल्याने हा असंतोषाचा भडका उडालाय. शिक्षेला विलंब म्हणजे न्याय नाकारणं होय असंही म्हटलं गेलं.

दिल्लीत 2012मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडलं. त्यावरून देशात प्रचंड असंतोष उफाळून आला. देशभर आंदोलनं झालीत. त्याचा तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या सरकारलाही फटका बसला. आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावणी होती. मात्र 7 वर्षानंतरही त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे न्याय केव्हा मिळणार असा सवाल विचारला जातोय.

निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाती चार दोषींपैकी एक असलेल्या अक्षय ठाकुरच्या फाशीला रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आली होती. ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावण्यात आली. या सुनावणीवेळी दोषी अक्षयच्या वकीलांनी सत्ययुग ते त्रेतायुगाचे दाखले देत फाशी न देण्याची मागणी केली. दोषी अक्षयकडून वकील एपी सिंह यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायाधीश आर.भानुमति, न्यायाधीश अशोक बूषण, न्यायाधीश ए एस बोपन्न यांच्यासमोर सत्ययुग, त्रेतायुग यासह महात्मा गांधी, नथुराम गोडसे, दिल्ली प्रदूषण आणि मानवाधिकाराचे दाखले वकीलांनी दिले. मात्र, तिनही न्यायाधीशांनी वकीलांचा युक्तीवाद फेटाळून लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading