News18 Lokmat

'चौकीदार' नरेंद्र मोदींना उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल झाले 'बेरोजगार'

#MainBhiChowkidar भाजपच्या या मोहिमेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरच्या आपल्या नावापुढे #Berojgar हा शब्द लावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 09:57 PM IST

'चौकीदार' नरेंद्र मोदींना उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल झाले 'बेरोजगार'

अहमदाबाद18 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मी ही चौकीदार या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी ट्विटरच्या आपल्या नावापुढे Chowkidar हा शब्द लावला होता. सोशल मीडियावर Chowkidar या शब्दाने त्या दिवशी धुमाकूळ घातला होता.

भाजपच्या या मोहिमेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरच्या आपल्या नावापुढे Berojgar हा शब्द लावला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरचं राजकीय युद्ध आणखी वाढण्याची शक्यता आहे. राफेल विमानांच्या खरेदीच्य मुद्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी #ChowkidarChorHai ही घोषणा केली होती. सोशल मीडियावर ती लोकप्रियही ठरली. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने  #MainBhiChowkidar ही घोषणा दिली त्यामुळे प्रचाराची रंगत आणखी वाढली आहे.नेमकं काय झालं?

Loading...

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना काही दिवस उरले असताना भाजपच्या सोशल मीडिया सेल्सच्या चँपिअन्सनी एक नामी युक्ती लढवली आहे. स्वतः नरेंद्र मोदींनीच विरोधकांच्या टीकेचा सकारात्मक पद्धतीनं वापर करत विरोधी पक्ष नेत्यांवरच दमदार स्ट्राईक केला आहे.

मोदींवर टीका करताना विरोधकांनी 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं. याचाच वापर करत नरेंद्र मोदींनी नवं प्रचारतंत्र सुरु केलं आणि गंमत म्हणजे या प्रचारतंत्राचा एक भाग असलेला हॅशटॅग काही तासातच जगात पहिल्या क्रमांकावर आला. नरेंद्र मोदींनी शनिवारी सकाळी एक पोस्ट करत #MainBhiChowkidar असा हॅशटॅग वापरला.  काही वेळातच हा हॅशटॅग जागतिक स्तरावर ट्विटरचा नंबर वन ट्रेंड बनला.

Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...