पुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृत्ती, 8 जवान शहीद

पुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृत्ती, 8 जवान शहीद

दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात 8 जवान शहीद झाले आहे. तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस वसाहतीत हा घुसखोरी करून हल्ला चढवला होता.

  • Share this:

26 आॅगस्ट : जम्मू -काश्मीरमधील पुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृती झालीये. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात 8 जवान शहीद झाले आहे. तीन दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस वसाहतीत हा घुसखोरी करून हल्ला चढवला होता. हा हल्ला 2016 मध्ये पठानकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे होता.

शहीद झालेल्या जवानांमध्ये चार जवान हे सीआरपीएफचे आहे. तर एक सिपाई जम्मू-काश्मिरचा एक शिपाई आणि 3 राज्याचे पोलिसांसाठी विशेष काम करणारे अधिकारी होते. या हल्ल्यात महाराष्ट्रातील साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाले.

दहशतवादी पुलवामा येथील जिल्हा पोलीस वसाहतीत घुसले. या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबासह राहतात. दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला होता. दहशतवाद्यांची सुरुवातीला ओळख पटली नाही. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद ने स्विकारली आहे अशी माहिती लेफ्टिनेंट जनरल जे एस सिंधू यांनी दिली.

तर आजचा दिवस हा वाईट होता, जवानांनी मोठ्या शर्थीने सामना केला अशी प्रतिक्रिया पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी दिली.

एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दहशतवादी इमारतीतून बाहेर आला आणि अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनी त्याचा जागेवरच खात्मा केला.

First published: August 26, 2017, 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading